श्री सोमजाई मातेचा उत्सव सोहळा मांगवली येथे मोठ्या दिमाखात साजरा…!
सोमजाई मातेच्या दर्शनासाठी भक्तगणांची अलोट गर्दी...!

प्रतिनिधी – महेश शेलार ( माणगांव ) निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या मांगवली येथे दरवर्षी सोमजाई मातेचा उत्सव सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो. याहिवर्षी माणगांव तालुक्यातील नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला धावणारी श्री क्षेत्र मांगवली येथील जागृत देवस्थान असलेल्या सोमजाई देवीचा उत्सव सोहळा नुकताच मांगवली येथे मोठ्या उत्साहात पार पडला असून या सोहळ्याचे 12 वे वर्ष सुरु आहे. तरीही या सोहळ्यासाठी सर्व आजूबाजूच्या तसेच बाहेरून येणाऱ्या देवीच्या भक्त गणांनी उपस्थित राहून देवीच्या दर्शनाचा व तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. या सोमजाई मातेचे दर्शन घेण्यासाठी माणगांव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, रोहा उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर, पत्रकार पद्माकर उभारे यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली होती.
मांगवली येथील सोमजाई मातेच्या उत्सवाचे नियोजन मातेचे निश्चिम भक्त विजय पाखुर्डे हे दरवर्षी आपल्या स्वखर्चाने करत आले आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात अभिषेक, श्री सत्यनारायणाची महापूजा, याने करण्यात आली. त्यानंतर कोकणची लोककला म्हणजे नाचाचे जंगी सामने डबल बारी – शक्तिवाली शाहीर तेजल पवार – खालगाव – रत्नागिरी श्री भैरी भवानी नृत्य मंडळ मुंबई तसेच तुरेवाले शाहीर जगन्नाथ खारगांवकर – कुडगांव श्रीवर्धन ओम साई नृत्य कला पथक यांचे झाले. या कलेल्या उपस्थितांनी दाद दिली. तसेच आलेल्या भक्त गणांनी श्री सोमजाई देवीचा महाप्रसादाचा आस्वाद घेतला. सायंकाळी श्री सोमजाई ग्रामस्थ मंडळ मांगवली यांचे सुश्राव्य भजन झाले. रात्री सुप्रसिद्ध गायिका कोमलताई पाटोळे – मेंढापूर यांचे जागरण गोंधळ ऑर्केस्ट्रा झाला. या संपूर्ण कार्यक्रमाचा व तीर्थप्रसादाचा लाभ आजूबाजूच्या परिसरातील तसेच बाहेरून येणाऱ्या देवीच्या भाविक भक्तांनी घेतला.
या कार्यक्रमाचे आयोजन सोमजाई मातेचे भक्त तसेच छावा संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष विजय काशिराम पाखुर्डे मांगवली हे दरवर्षी स्वखर्चाने करत असतात तसेच मांगवली ग्रामस्थ व महिला मंडळ आणि मुंबईकर मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या नियोजनबद्ध कार्यक्रमासाठी समाधान उतेकर, संतोष खडतर – सरपंच, सुवर्णा जाधव, नामदेव हळदे, राजेंद्र सकपाळ, संकेत पाखुर्डे, विशाल साळवी, रमाकांत पाटील, नंदू पालकर तसेच अमर दसवते, मंगेश पवार – उपसरपंच, बाबु पाखुर्डे – माजी उपसरपंच, अनिल जोशी, अल्पेश मोरे, ज्ञानेश्वर वाढवळ, राजेंद्र गोलंबरे, संतोष जाधव, रमेश पाखुर्डे – अध्यक्ष मांगवली, तुषार लहाने, सुरज पाखुर्डे, गोरख वाघोसकर, दिलीप मुंडे यांनी संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली.