Join WhatsApp Group
आपला जिल्हा

ना. भरत शेठ गोगावले आणि कुटुंबियांचा गोरेगाव नगरीत महाड मतदार संघ कुणबी समाजाच्या वतीने भव्य जाहिर सत्कार संपन्न

महाड मतदार संघ कुणबी समाजाच्या वतीने गोगावले परिवाराची न भुतो न भविष्यती अशी रथात बसून मिरवणूक

हजारोंच्या संख्येने कुणबी समाजाच्या साक्षीने जाहिर सत्कार

आई श्रीमती विठाबाई गोगावले सह पत्नी सौ. सुषमाताई गोगावले भावूक

गोरेगांव / रोहिदास नगर ( प्रसाद गोरेगांवकर ) महाड मतदार संघ कुणबी समाजाच्या वतीने न भुतो ना भविषती असा जाहिर ना. भरतशेठ गोगावले यांचा भव्य सत्कार समारंभ रविवारी १३ एप्रिल रोजी सायंकाळी गोरेगांव नगरीतील राजमाता जिजाऊ मैदानात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

ना. भरतशेठ गोगवले यांच्या जाहिर भव्य सत्कारावेळी न भुतो ना भविष्यती अशी मिरवणुक चिंचवली येथून रथात काढत ढोल ताशा, बेंड बाज्याच्या गजरात तसेच फटाका्यांच्या आतीशबाजेत रोशनाईने सजवलेल्या घोड्याच्या रथाव भव्य दिव्य मिरवणूक गोरेगांव नगरीतील राजमाता जिजाऊ मैदानात हजारोंच्या संख्येने आणण्यात आली यावेळी ना. भरतशेठ गोगावले यांची आई श्रीमती. विठाबाई गोगावले, पत्नी सुषमाताई गोगावले व मुलगी शितलताई गोगावले देखील उपस्थित होत्या.

महाड विधानसभा मतदार संघ कुणबी समाज बांधवांच्या वतीने हजारो कुणबी समाज बांधबांच्या साक्षीने न भूतो न भविषती” असा जाहिर सत्कार रविवारी १३ एप्रिल रोजी सलग चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयाचा चौकार मारत कॅबिनेट मंत्री पदावर विराजमान झाल्याने ना. भरतशेठ गोगावले व परिवाराचा जाहिर सत्कार पार पडला.

यावेळी ना. भरतशेठ गोगावले यांनी सर्वप्रथम कुणबी समाजाने सत्कार केल्याने आभार व्यक्त करीत एका सामान्य शेतकरी कुंटूंबात जन्माला येत त्यांच्या गरीबीच्या दिवसांतील आठवणी सांगताना कनकुडीची भाकरी, सुकटीचा बरबट खाण्यापासून ते ९वी नापास झाल्यानंतर वॉचमनची नोकरी ते सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य ते आमदार व मंत्री पदाचा प्रवास सांगितला दरम्यान आई विठाबाई गोगावलेंसह सह पत्नी सुषमाताई गोगावले भावुक झाल्या होत्या.. प्रसंगी चौथांद्या आमदारकीला उभे राहिल्यानंतर विरोधकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते, महाडच्या इतिहासात जे ३ वेळा निवडून आले ते चौथांदा निवडून येत नाहित पण तुम्हा मायबाप मतदारांचे अनंत उपकार या भरतशेठवर आहेत. मतदारांचा सिहांचा वाटा आहे सोबतच कार्यकर्ते, पदाधिकारी यांची देखील तेवढीच मेहनत आहे. आज मी जो काही आमदार आहे, मंत्री आहे तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच आहे.

सलग चौथांद्या निवडून येत मंत्री म्हणून निवडून आपण सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी इतिहास रचला, विरोधक आत्मचिंतन करायाला लागलेत. विरोधकांना आता इकडन तिकडून उड्या मारण्यापलिकडे काम राहिलेले नाही. पर्याय उरलेेला नाही. जोपर्यंत तुमची आमची नियत नित्तिमता चांगली आहे. तोपर्यंत कोणाला काळजी करण्याचे कारण नाही. जेव्हा तुमची नियत नित्तिमत्ता बिघडली तर तर तुमचा जय महाराष्ट्र झाला समजा.

 

यावेळी महाड विधानसभा मतदार संघातील कुणबी समाजाचे सर्व पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने कुणबी महिला व समाजबांधव तसेच जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके, लोणेरे सरपंच प्रकाश टेंबे. उद्योजक सितारा उभारे, महेंद्र तेटगुरे, रवि टेबे, पंढरीनाथ शेडगे, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर व उपजिल्हा प्रमुख ऱमेश मोरे उपस्थित होते.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये