छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवसेनेच्या वतीने पुष्पहार अर्पण.
प्रतिनिधी - ओमकार नागांवकर ( अलिबाग )

अलिबाग : महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचे प्रतीक असलेले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी संपूर्ण देशभरात शिवरायांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यांच्या शौर्याची भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचे विचार पूजले जातात. त्यांचे युद्ध धोरण, गनिमी कावा शैली आणि प्रशासकीय कार्यक्षमता आजही सर्वांना प्रेरणा देतात. त्यांची ही जयंती महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर आनंदाने आणि अभिमानाने साजरी केली जाते.
शिवरायांची जयंत्ती सर्वजण अभिमानाने साजरी करतो, शिवरायांच्या जयंतीनिमित्त अलिबाग मधील महाराजांच्या पुतळ्याला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा सल्लागार सतीश पाटील, विभाग प्रमुख नरेश गावंड, कैलास गजने, चौल ग्रामपंचायत उपसरपंच अजित गुरव, विकास पिंपळे, विशाल ठाकूर व कार्यकर्ते उपस्थित होते.