श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे शिवजयंती निमित्त गोर गरीब गरजूना ब्लॅंकेट वाटप
प्रतिनिधी - विठ्ठल ममताबादे ( उरण )

उरण – श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. १९ फेब्रुवारी अर्थातच शिवजयंती. या शिवजयंतीचे औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेतर्फे उरण तालुक्यातील करळ फाटा येथे झोपडपट्टीतील गोरगरीब गरजू व्यक्तींना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या कार्यक्रम प्रसंगी श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुदेश पाटील, कार्याध्यक्ष विठ्ठल ममताबादे,सल्लागार महेश पाटील, चिटणीस अभय पाटील, सोशल मीडिया प्रमुख साहिल म्हात्रे,सादिक शेख,सदस्य नितेश पवार, सागर घरत, विजय कोळी,भाविक पाटील,आर्यन पाटील, अर्णव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ब्लॅंकेटचे वाटप केल्याने गरजू व्यक्तींनी समाधान व्यक्त करत संस्थेच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे आभार मानले.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेने आजपर्यंत अनेक लहान मोठे वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. संस्थेच्या सर्वच उपक्रमांना जनतेचा नेहमी उत्तम प्रतिसाद लाभल्याचे यावेळी अध्यक्ष सुदेश पाटील यांनी सांगितले.