Join WhatsApp Group
राजकीय

गोरेगांव व मांजरोने गणातील उबाठा गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षात जाहीर प्रवेश

नामदार भरतशेट गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरीत उबाठा, राष्ट्रवादी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेनेकडे कल

माणगांव तालुक्यात विरोधकांना दणक्यावर दणका, अनेक उबाठा गटातील कार्यकर्त्यांचा लवकरच शिवसेना पक्षात प्रवेश 

गोरेगांव  – माणगांव तालुक्यात नामदार भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरीत उबाठा, राष्ट्रवादी अजित पवार गट, तसेच शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सद्या शिवसेना पक्षात सातत्याने पक्ष प्रवेश होताना पाहायला मिळत आहे. रविवारी दि. १३ एप्रिल रोजी  रात्री १० वाजता पुरार येथे बहुसंख्य गवळी समाज बांधवांचा राष्ट्रवादी पक्षातून शिवसेना पक्षात जाहिर प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला होता यानंतर काल दि. १४ एप्रिल रोजी पुन्हा  गोरेगांव व मांजरोने विभागातील वेगवेगळ्या वाडी व गावातील उबाठा गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उबाठा गटाला सोड चिट्टी देत ढालकाठी येथील शिवनेरी बंगल्यावर प्रत्यक्ष नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते शिवसेना पक्षाची भगवी फीत गळ्यात घालून शिवसेना शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला.

शिवसेना पक्ष प्रवेशकर्तांमध्ये उबाठा गटाचे गोरेगाव युवा सेना गण संपर्कप्रमुख रोहित रातवडकर, माजी नांदवी ग्रामपंचायत सदस्य राजा बिरवाडकर, माजी नांदवी ग्रामपंचायत सदस्य राजा म्हाप्रळकर, माजी चिंचवली ग्रामपंचायत सदस्य रुपेश तळवटकर, संजीव म्हस्कर, महेश तळवटकर, यशवंत रातवडकर, तुकाराम रातवडकर, जितेंद्र पालकर, रुपेश रातवडकर, राकेश रातवडकर, विनोद रातवडकर  यांनी काही दिवसांपुर्वी उबाठा गटाच्या महाड विधानसभा समन्वयक पदाला सोडचिट्टी देत शिवसेना पक्षात प्रवेश केलेले निलेश केसरकर यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला.

दरम्यान उबाठा मधुन नुकतेच प्रवेश केलेले महाड विधानसभा समन्वयक निलेश केसरकर यांनी नामदार भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून महाड मतदार संघातील प्रत्येकी गांव, वाडी, मोहल्ला येथे विकासाची गंगा वाहत आहे व नामदार गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून हा पक्ष प्रवेश झाला असल्याचे सांगत, लवकरच अनेक उबाठा कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश होणार असल्याचा खंबीर विश्वास  निलेश केसरकर यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

यावेळी शिवसेना पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके, माजी सभापती महेंद्र तेटगुरे, माजी सभापती सुजित शिंदे, रवींद्र टेंबे, गोरेगांव विभागिय अध्यक्ष दिनेश हरवंडकर,  सिताराम उभारे, शरीफ हर्गे, नथुराम बामणोलकर, अभिजित टेंबे, समीर रातवडकर, प्रसाद मांजरे, धोंडूबुवा कुंभार, वामन बैकर, वडवली सरपंच मजहर डावरे व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये