ना. भरतशेठ गोगावले सारखा मंत्री लाभणे हे आपले भाग्य- उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे.
महाड मतदार संघ कुणबी समाजाच्या वतीने न भुतो ना भविषती असा ना. भरतशेठ गोगावले यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न

रोहिदास नगर / गोरेगांव ( प्रसाद गोरेगांवकर) महाड मतदार संघ कुणबी समाजाच्या वतीने न भुतो ना भविषती असा ना. भरतशेठ गोगावले यांचा भव्य सत्कार समारंभ रविवारी १३ एप्रिल रोजी सायंकाळी गोरेगांव नगरीतील राजमाता जिजाऊ मैदानात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
महाड विधानसभा मतदार संघ कुणबी समाज बांधवांच्या वतीने हजारो कुणबी समाज बांधबांच्या साक्षीने जाहिर सत्कार रविवारी १३ एप्रिल रोजी सलग चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजयाचा चौकार मारत कॅबिनेट मंत्री पदावर विराजमान झाल्याने ना. भरतशेठ गोगावले व परिवाराचा जाहिर सत्कार पार पडला.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री रमेश मोरे हे ना. भरतशेट गोगावले यांच्यासारखे मंत्री, आमदार मिळणे हे आपले भाग्यच आहे. ना. भरतशेठ गोगावले हे आपले दैवत आहेत मंत्र्याचा प्रोटोकॉल काय असतो हे सर्वाना प्रचलित आहे पण आपले भरतशेट म्हणजे पांडूरंग आहेत. जसे पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनासाठी गर्दी असते तशीच गर्दी भरतशेटला भेटण्यासाठी ढालकाठी येथील शिवनेरी वर जेवढी गर्दी असते तेवढीच गर्दी मुंबईत देखील मंत्रालयात पहायला मिळते. पुढे बोलताना म्हणाले की, हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे हिंदुत्वाचे विचार कोणी घेऊन पुढे जात असेल तर ते महाराष्टाचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब आहेत. शिंदे साहेब जर राम असतील तर आपले भरतशेठ हे त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालणारे लक्ष्मण आहेत.
यावेळी सत्कामुर्ती गोगावले कुंटूबियांसह जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके, जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, पंचायत समिती सदस्य जितेंद्र सावंत, उद्योजक सितारामशेठ उभारे, प्रकाश टेंबे तसेच हजारो संख्येंने कुणबी समाज व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.