राष्ट्रीय बँडी आईस स्केटिंग कॅम्प गुलमर्ग जम्मू काश्मीर येथे संपन्न
कुमार तनय ज्ञानेश्वर उतेकर याचा गुलमर्ग डेव्हलपमेंट ऑथोरिटीचे प्रमुख तारिक हुसेन यांच्याकडून काश्मीर गुलमर्ग येथे सन्मान

प्रतिनिधी – पद्माकर उभारे ( माणगांव ) – द्वितीय राष्ट्रीय बँडी कॅम्प आईस स्केटिंगग कॅम्प गुलमर्ग जम्मू काश्मीर येथे दिनांक ५ ते ९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान बँडी आईस हॉकी कोर्ट गुलमर्ग येथे संपन्न झाला. सदर कॅम्प साठी संपूर्ण भारत देशातून २४५ विध्यार्थी यांनी सहभाग नोंदविला यामध्ये प्रामुख्याने जम्मू काश्मीर, तामिळनाडू, हरियाणा, गोवा गुजरात, दिल्ली, कर्नाटक, कलकत्ता व महाराष्ट्र इत्यादी राज्यातील खेळाडू सहभागी झाले होते. सदर कॅम्प मध्ये तासगाव या छोटया गावचा होतकरू खेळाडू कुमार तनय ज्ञानेश्वर उतेकर याने – ९ डिग्री तापमाना मध्ये चांगल्या प्रकारचा सरावकरून स्पर्धेत उत्तम रीत्य खेळ केला. त्याबद्दल गुलमर्ग डेव्हलपमेंट ऑथोरिटी चे प्रमुख तारिक हुसेन मुख्य कार्यकारी अधिकारी गुलमर्ग विकास प्राधिकरण व ताहीर वाणी असिस्टंट डायरेक्टर टुरिझम गुलमर्ग यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
गुलमर्ग येथे असक्रोफ डिजो आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक बँडी तसेच विशाल सोलंकी राष्ट्रीय प्रशिक्षक बँडी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तनय सध्या गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मिडीयम स्कूल माणगांव, जिल्हा रायगड येथे शिकत असून त्याचा सराव श्रेयश गमरे अशोक दादा साबळे विद्यालयात ऑफ आईस वर घेत आहे. त्याच्या पुढील वाटचालीस महाराष्ट्राचे कॅॅबिनेट मंत्री फलोद्यान रोजगार हमी मंत्री नामदार भरतशेठ गोगावले तसेंच माणगाव शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ऍड. राजीवजी साबळे व बँडी असोसिएशन रायगड चे सचिव संजय गमरे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.