युनिक क्रिकेट क्लब पुरार यांसकडून भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
३२ संघाच्या प्रवेशामुळे युनिक क्रिकेट क्लब पुरार आयोजित स्पर्धा परंपरेनुसार हाऊस फुल्ल

प्रतिनिधी – रिजवान मुकादम ( पुरार ) माणगांव तालुक्यात युनिक क्रिकेट क्लब पुरार एक प्रसिद्ध क्रिकेट क्लब असून युनिक क्रिकेट संघ माणगांवातच नव्हे तर संपुर्ण रायगड जिल्ह्यात नावाजलेला संघ आहे. युनिक क्रिकेट क्लब हा निष्पक्ष, पारदर्शी व यशस्वीरित्या क्रिकेट स्पर्धा पार पाडण्यासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. जेष्ठ व माजी खेळाडूंकडून सुरु झालेली पारदर्शी क्रिकेट स्पर्धा घडवण्याची प्रथा आज ही युवा पीढी ( खेळाडू, व सदस्य ) ने देखील सुरु ठेवली आहे त्यामुळे यु. सी. सी. आयोजित स्पर्धेत भाग घेण्यासाठी परिसरातील तसेच कोकणातील अनेक संघ उत्सुकता दर्शवतात.
युनिक क्रिकेट क्लब पुरार च्या वतीने यावर्षी भव्य एक दिवसीय टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २२ ते २५ फेब्रुवारी पर्यंत आयोजित क्रिकेट स्पर्धेत एकूण ३२ संघाना भाग घेता येईल. आज सोमवार दिनांक २४ फेब्रुरी पर्यंत तीन दिवसाचे सामने पूर्ण झाले असून स्पर्धेच्या पहिल्या दिवसी महाड तालुक्यातील तुडील , दुसऱ्या दिवसी महाड तालुक्यातील लाडवली व तीसऱ्या दिवशी माणगांव तालुक्यातील मोर्बा संघ असे एकूण तीन संघ उपांत्य फेरीत पोहचले असून उद्या मंगळवार रोजी स्पर्धेचा अंतिम दिवसीय आठ संघातून कुठला संघ आपली प्रतिभा, कौशल्य, जिद्दी ने उपांत्य फेरीत पोहोचतोय व उपांत्य फेरीत पोहचणाऱ्या चार संघातून अजिंक्यपद कुठला संघ पटकवतोय याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे स्पर्धेचे आयोजक व यजमानी युनिक क्रिकेट क्लब पुरार च्या संघाना स्पर्धेत पराभव स्वीकारावा लागला आहे तरी देखील युनिक क्रिकेट क्लब पुरार मार्फत प्रथमच भव्य स्पर्धेचा पारंपरिक रित्या सफल, निष्पक्ष, व पारदर्शी आयोजनामुळे आनंदित पुरार येथील जेष्ठ व कनिष्ठ क्रिकेट खेळाडूंमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. या स्पर्धेसाठी यू.सी.सी क्लब मार्फत युट्युब लाईव्ह, प्रोफेशनल अर्थात व्यवसायिक पंच व समलोचकांची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
या भव्य स्पर्धेच्या प्रथम क्रमांकासाठी बक्षीस रोख रक्कम १ लाख ११ हजार १११ रुपये व आकर्षक चषक ,द्वितीय क्रमांकसाठी बक्षीस रुपये ५५ हजार ५५५ रोख रक्कम व आकर्षक चषक तसेच तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी संघाला रुपये २० हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार असून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व मालिकावीर पटकावणाऱ्या खेळाडूंना देखील उत्कृष्ट चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे…. युनिक क्रिकेट क्लब पुरार स्पर्धेसाठी रोख रक्कम बक्षीस युनिक क्रिकेट क्लब च्या वतीने तसेच स्पर्धेचे प्रथम, द्वित्य, तृतीय, चतुर्थ क्रमांकासाठी व उत्कृष्ट गोलंदाज,उत्कृष्ट फलंदाज,मालिकावीर साठी आकर्षक चषक एन.आर.ए. ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष नरेश दादा आहिरे यांच्या वतीने देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येकी सामन्यातील सामनावीर ठरणाऱ्या खेळाडूला युनिक प्रांडा च्या वतीने आकर्षक चषक देण्यात येत आहे.