मुंबई विद्यापीठ एथेलेटिक्स स्पर्धेत खोपोली महाविद्यालयाचे घवघवीत यश
राजू मुंबईकर व स्नेहल पालकर यांनी विद्यार्थ्यांना भेटवस्तु देऊन केले अभिनंदन.

प्रतिनिधी -विठ्ठल ममताबादे ( उरण ) मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन झोन -१ च्या ऍथलिटिक्स स्पर्धा १६ आणि १७ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई विद्यापीठ क्रीडांगण मुंबई मरीन लाइन्स येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेत के. एम. सी. महाविद्यालयातील खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करून यश संपन्न केले.
या स्पर्धेत साहिल विचारे, प्रणव सावंत, सुजल घरत, विकास थिकडे, तुषार मेठल, साहिल धायगुडे यांनी ४०० मीटर रिले स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले. पूर्वा जाधव, मुस्कान खान, साक्षी गुप्ता, शर्वरी शेवाळे, साक्षी गुप्ता, पायल पटेल यांनी ४०० मीटर रिले स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले. साहिल विचारे, सुजल मेठल, प्रणव सावंत, मुस्कान खान, पूर्वा जाधव यांनी १०० मीटर मिश्र रिले स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त केले. वैयक्तिक स्पर्धेत गौरव गुरुमकर (उंचउडी – कांस्य पदक), पूर्वा जाधव (८०० मीटर धावणे – रौप्य पदक, ४०० मीटर धावणे – कांस्य पदक), ईशा देशमुख (१० किलोमिटर धावणे – रौप्यपदक), गार्गी मसुरकर (थाळीफेक – कांस्यपदक) असे यश मिळविले.
या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक डॉ. जयवंत माने, अक्षय कदम, यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयांसह सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच या विद्यार्थ्यांचे केअर ऑफ नेचर संस्थेचे संस्थापक रायगड भूषण राजू मुंबईकर आणि अध्यक्ष स्नेहल पालकर यांनी भेटवस्तू देऊन विशेष अभिनंदन केले.