संभाजी ब्रिगेड उरणच्या विद्यार्थ्यांना मोफत रायगड दर्शन
जिजाऊ जन्मोत्सव निमित्ताने संभाजी ब्रिगेड उरण तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन

प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे ( उरण ) पाचाड येथे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दर वर्षीप्रमाणे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावर्षी जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने संभाजी ब्रिगेड उरण तालुका अध्यक्ष शिवश्री चंदन प्रकाश कडू, उरण तालुका उपाध्यक्ष शिवश्री भावेश बाळकृष्ण शेळके यांनी एक नवीन आणि समाजाला दिशा देणारं असा उपक्रम यावेळी राबविले.
यावेळी संभाजी ब्रिगेड उरणच्या माध्यमातून जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्ताने वीर वाजेकर ज्युनिअर कॉलेज फुंडे या महाविद्यालयातील मुलांना मोफत रायगड दर्शन घडविण्यात आले. महाविद्यालयातील तरुण मुली/मुलांना राजमाता जिजाऊ माँसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, एकूणच छत्रपती घराण्याचा दैदिप्यमान इतिहास माहीत व्हावा आणि जास्तीत जास्त मुलांच्या मनात शिवाजी महाराजांच्या गडकिल्यांबद्दल आणि इतिहासाबद्दल आवड निर्माण व्हावी हाच कार्यक्रम घेण्यामागचा एकमेव उद्देश होता.
हा कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडावे म्हणून रायगड जिल्हा अध्यक्ष शिवश्री परमानंद जांभळे, शिवश्री समीरदादा म्हात्रे, शिवश्री धर्मेंद्र पाटील, श्रीमती रेश्मा विजय कडू, शिवश्री मयुरेश विजय कडू, शिवश्री महेश पाटील, श्रीमती सुजाता पारवे, शिवश्री अनिल पारवे, वीर वाजेकर ज्युनिअर कॉलेजचे खारकर सर या सर्वांनी विशेष मेहनत घेतली.सदर कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सर्वांचे व कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थांचे चंदन कडू (संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष उरण)यांनी तसेच संभाजी ब्रिगेडच्या सर्व पदाधिकारी यांनी आभार मानले आहेत.