जे.बी. सावंत हायस्कूल पन्हळघर लोणेरे येथे संविधान विषयी व्याख्यानाचे आयोजन.
प्रतिनिधी - नंदकुमार चांदोरकर ( चांदोरे/माणगाव )

चांदोरे/माणगाव – शासन निर्णयानुसार समितीच्या वतीने निर्णयानुसार माहे-जानेवारी २०२५ मध्ये शाळा स्तरावर व्याख्यान, गटचर्चा आदी उपक्रमांचे आयोजन करण्यासंदर्भात असलेल्या आदेशाप्रमाणे आज ‘जे. बी. सावंत माध्यमिक विद्यालय, लोणेरे’ येथे ‘संविधान म्हणजे नक्की काय व ते जाणून घेणे का गरजेचे आहे? याविषयी व्याख्यान तथा गटचर्चा आयोजित करण्यात आली. संविधान अभ्यासक नुरखॉं पठाण सर यांनी अतिशय साध्या व सोप्या भाषेत मांडणी करत संविधानाचे महत्व विषद केले.
‘घर घर संविधान’ ह्या शासन निर्णयाची एक आदर्श अंमलबजावणी आपल्या माणगाव तालुक्यात आद. श्रीमती सुरेखा तांबट मॅडम, गटशिक्षणाधिकारी, माणगाव यांच्या नेतृत्वाखाली व त्यांनी केलेल्या नियोजनानुसार होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज ‘जे. बी. सावंत माध्यमिक विद्यालय, लोणेरे’ येथे ‘संविधान गुण गौरव समिती’ च्या सहकार्याने संविधान जनजागृतीसह एका लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात ‘जे. बी. सावंत माध्यमिक विद्यालय, लोणेरे’ च्या तब्बल २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
याप्रसंगी केंद्र प्रमुख आद. संजय खैरे, मुख्या. आद. कांबळे सर, संविधान प्रचारक आद. नुरखॉं पठाण सर, जे. बी. सावंत माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.