पाष्टी हायस्कुल ची पावसाळी सहल व अभ्यास दौरा
विद्यार्थ्यांनी शेतात उतरून घेतला शेती विषयक प्रत्यक्ष अनुभव

प्रतिनिधी – संतोष उध्दरकर (म्हसळा) प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी माध्यमिक शाळा पाष्टी यांची पावसाळी अभ्यास शैक्षणिक सहल दि. २४ ऑगस्ट रोजी ग्रुप ग्रामपंचायात माजी सरपंच तथा आदर्श शेतकरी चंद्रकांत पवार यांच्या शेतावर काढण्यात आली. या वेळी शाळेतील मुलांना चंदकांत पवार यांनी शेती विषयक मार्गदर्शन करुन शेती कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आणि विद्यार्थी यांनी देखील शेती कशी करावी याचा शेताच्या बांदावर उतरून प्रत्यक्ष अनुभव घेतला. शेतामधील गवत काढणे , लावणी अगोदर शेतामध्ये कसे राब पेरायचे, लावणी कशा पद्धतीने करायची या बाबतीत धडे घेतले यावेळी विदयार्थी यांच्या मध्ये उत्साह दिसुन येत होता.
सोबतच शारीरिक विकास कसा करावा या साठी पोहण्याचे देखील प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. गणपती विसर्जन घाट तलावाच्या इथे प्रात्यक्षिक करुन दाखवत बॉटल जॅकेट, लाईफ जॅकेट, प्लास्टिक चे कॅन यांचा उपयोग कसा करावा आणि आपला आणि दुसऱ्या व्यक्तीचा जीव कशा प्रकारे वाचविता येऊ शकतो याचे अचुक पवार यांनी मार्गदर्शन केले. तसेच या वेळी सरपंच चंद्रकांत पवार यांच्या पत्नी स्नेहा पवार यांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्यासाठी अल्पोपहार आणि दूध वाटप केले. या वेळी विद्यार्थी यांच्या सोबत पाष्टी शाळेचे शिक्षक प्रफ्फुल पाटील, विनयकुमार सोनवणे, बिलाल शिकलगार, ललित पाटील उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापक सुदाम माळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली या आनंददायी शनिवार व वर्षा सहली चे नियोजन करण्यात आले. या वेळी राज्यास्तरीय संविधान गुण गौरव परीक्षेत कु.प्रिंसि उत्तम शिंदे हिचा प्रथम क्रमांक आल्या बद्दल तिच्या पालकाकडून सर्व विद्यार्थ्यांना मोतीचूर लाडू वाटप करण्यात् आले. वर्षा सहली मध्ये आनंदा सोबतच विद्यार्थ्यांना शेतीचे ज्ञान उपलब्ध करून दिल्या बद्दल स्थानिक स्कुल कमिटी, शाळा समिती व पालक कमिटी यांच्या कडून शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांचे अभिनंदन करण्यात आले.