Join WhatsApp Group
आपला जिल्हा

कोकणी तानाबाना महिला शिवणकामाचा दिमाखदार शुभारंभ

गोरेगांव

गोरेगांव –  माणगाव तालुक्यातील दहिवली येथे महिलांनी शिवणकामाचे युनिट सुरु केले आहे. या युनिटचा शुभारंभ दिनांक २१ जानेवारी रोजी समाजातील प्रतिष्ठित महिला, पंचक्रोशीतील शिवणकाम करू इच्छिणाऱ्या महिलांनी कोकणी तानाबाना सेंटरला भेट देत करण्यात आला. तालुक्यात महिला उद्योजक तयार व्हाव्यात  यासाठी सेवा इंटरनॅशनल संस्थेच्या मदतीने ओरॅकल कंपनीने पुढाकार घेतला आहे.

तालुक्यात शिवणकामाचे युनिट चालु होण्यासाठी माणगावमधील व्यापारी, महिला बचत गट व पोस्को कंपनीने वेळोवेळी खूप मदत केली असून आज खेडेगावातील महिला प्रशिक्षण घेऊन अद्यावत मशीनवर कापडी पिशव्या शिवत एक नवीन ओळख निर्माण करत आहेत. पुण्याहून अमिता मिशी, अर्चना जोशी यांनी युनिट उभे राहण्यासाठी कष्ट घेतले आहेत तसेच माणगाव तालुक्यातील कुलदीप पुरंदरे, आसावरी काळे, तेजस गांधी, डॉ. रश्मी वरखंडकर, गणेश खातू, संदीप घाग, तेजस गांधी, भोस्तेकर कुटुंब यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

या युनिटच्या माध्यमातून महिलांनी बनविलेले सुंदर बटवे, कापडी पिशव्या व इतर वस्तू सेंटरला भेट देणाऱ्या लोकांनी यावेळी खरेदी केल्या. या शुभारंभा प्रसंगी टी एस भोस्तेकर विद्यालयाने युनिटसाठी जागा देऊन दहिवलीमध्ये महिलांच्या उन्नतीच्या संधी निर्माण केल्या असे अमिता मिशी यांनी सांगितले. प्लास्टिक पिशव्या ऐवजी कापडी पिशव्या लोक वापरत आहेत, त्यांना रास्त दरात पिशव्या उपलब्ध करत आहोत असे कोकणी तानाबाना प्रमुख साक्षी म्हाप्रळकर यांनी आवर्जून सांगितले.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये