सहाव्या पुष्प ज्ञानशिदोरी दिना निमित्त न्यु इंग्लिश स्कुल म्हसळा तर्फे पत्रकारांचा सन्मान
मोबाईलचा वापर अभ्यासापूर्तीच करावा.. जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे

प्रतिनिधी – संतोष उध्दरकर ( म्हसळा ) दि. १८ जाने रोजी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसळा विद्यालयात श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह निमित्त सहाव्या पुष्पाची गुंफण करण्यासाठी म्हसळा तालुक्यातील सर्व पत्रकार यांना आमंत्रित करण्यात आले होते. या प्रसंगी स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन समीर बनकर यांनी उपस्थित पत्रकार यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. मला ही शाळा डिझिटल करायची आहे या साठी सर्वांचे सहकार्य मिळावे असे प्राचार्य पाटील यांनी उपस्थित मान्यवर यांच्या समोर व्यथा मांडली, यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना पत्रकार सुशील यादव यांनी सांगितले की यांत्रिक युगात मोबाईलचा वापर योग्य तो कामासाठी करणे गरजेचे आहे, तसेच प्रगत युगात शिक्षकांचा आदर केला पाहिजे, शालेय जिवनात ध्येय, उद्दीष्ट ठरवा, पत्रकार महेश पवार यांनी देखील विध्यार्थी यांच्याशी संवाद साधतांना शिक्षणा बरोबर व्यवसाईक शिक्षण मिळणे तितकेच महत्वाचे आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे यांनी आपल्या मनोगतात स्वामी विवेकानंद सप्ताह निमित्त विविध स्पर्धा घेतल्या जात असून यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव दिला जातो म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर फक्त अभ्यासा पूर्तीच करावा असेही खांबेटे यांनी सांगितले तसेच १७ जानेवारी रोजी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. अभयकुमार साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘ज्ञानशिदोरी’ या उपक्रमानिमित्त विद्यालयात ग्रंथपाल सौ. म्हात्रे मॅडम यांनी ग्रंथ प्रदर्शनचे नियोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ई. सी पाटील व सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक मोरे एच.बी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार जु. कॉ. प्रमुख सौ. देवगावकर मॅडम यांनी मानले.
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे, ज्येष्ठ पत्रकार उदय कळस, प्रेस क्लब अध्यक्ष शशिकांत शिर्के, दि म्हसळा टाईम्सचे रमेश पोटले, महेश पवार, सुशिल यादव, दै.सूर्योदय उपसंपादक संतोष उध्दरकर, वैभव कळस, मुकुंद बोर्ले, निकेश कोकचा उपस्थित होते त्याचबरोबर चेअरमन समीर बनकर, प्राचार्य पाटील डी आर, मांजरेकर जे. के. जमदाडे मॅडम, शिर्के मॅडम, सहारे सर, गर्जे सर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सर्व शिक्षकांच्या वतीने शाळेच्या विकासासाठी एक हात मदतीचा देऊन दिड लाखाहुन अधिक आर्थिक मदत देणगी स्वरूपात मुख्याध्यापक पाटील यांच्या हाती सुपूर्द करण्यात आली. या संपूर्ण सप्ताहात क्रिडा, विविध स्पर्धा, सांस्कृतिक, समुहगान असे भरभरुन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.