कै. निलेश म्हात्रे याच्या अपघाताच्या निषेधार्थ नवी मुंबई महानगर पालिकेसमोर आंदोलन
कै. निलेश म्हात्रे याला न्याय देण्याची कुटुंबियांची प्रशासनाकडे मागणी.

प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे ( उरण ) दि.०८ फेब्रुवारी २०२४ रोजी उरण तालुक्यातील खोपटे येथे एन.एम.एम.टी. प्रवासी बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या भीषण अपघातात निलेश शशिकांत म्हात्रे (वय ३७ वर्षे,राहणार खोपटे ) या निःष्पापाचा मृत्यु झाला होता सोबतच केशव ठाकूर( खोपटे) हे गंभीररित्या जखमी झाले होते त्यानंतर नवी मुंबई महानगर परिवहन मंडळ यांनी २० दिवसांच्या आत मयत व जखमी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे हमीपत्र लिहून दिले होते.
मात्र आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मुंबई महानगर परिवहन मंडळ व नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन यांच्याकडून झालेली नाही. तरी याच्या निषेधार्त पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दि. १६ ऑक्टोबर २०२४ रोजी नवी मुंबई महानगर पालिका सी. बी. डी. बेलापूर येथे सकाळी १०:०० वाजता शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या आंदोलनात आपली बहुमूल्य उपस्थिती दाखवून मयत निलेश म्हात्रे यांच्या कुटुंबियाना न्याय मिळवून देवूया असे आवाहन मयत कै. निलेश म्हात्रे यांच्या कुटुंबियांनी जनतेला केले आहे. मयत कै. निलेश म्हात्रे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणारच असा निर्धार पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी केला आहे. न्याय मिळण्यास विलंब होत असल्याने पनवेल संघर्ष समितीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.