Join WhatsApp Group
आपला जिल्हा

सात विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ७३ उमेदवार रिंगणात

आज ३८ उमेदवारांनी घेतली नामनिर्देशनपत्रे मागे

रायगड – महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात आज नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याच्या दिवशी ३८ उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे मागे घेतल्यामुळे जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. या जागांसाठी दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६.00 या वेळेत मतदान होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली.

मतदार संघ निहाय उमेदवारांची माहिती पुढीलप्रमाणे

१८८ – पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी १० उमेदवारांनी माघार घेतली असून आता १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे.

१) गजेंद्र  कृष्णदास अहिरे ( बहुजन समाज पार्टी, चिन्ह हत्ती )  २) प्रशांत रामशेठ ठाकूर ( भारतीय जनता पार्टी चिन्ह कमळ )  ३) योगेश जनार्दन चिले ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना, चिन्ह रेल्वे इंजिन )  ४) लीना अर्जुन गरड ( शिवसेना उबाठा, चिन्ह मशाल )  ५) कांतीलाल हरिश्चंद्र कडू ( लोकमुद्रा जनहित पार्टी, चिन्ह सितार )  ६) पवन उत्तमराव काळे ( भारतीय जनसम्राट पार्टी, चिन्ह पाटी ) ७) श्री. बाळाराम दत्तात्रेय पाटील   ( पिझंटस् अँड वर्कर्स  पार्टी ऑफ इंडिया,  चिन्ह शिट्टी )  ८) डॉ. वसंत उ त्तम राठोड   ( डिजिटल ऑर्गनायजेशन ऑफ नेशन, चिन्ह ट्रम्पेट )  ९) संतोष शरद पवार ( रिपब्लिकन सेना, चिन्हे गॅस सिलेंडर ) १०) चेतन नागेश भोईर   ( अपक्ष,  चिन्ह  पेनड्राईव्ह  )  ११ ) प्रकाश रामचंद्र चांदीवडे  ( अपक्ष, चिन्ह कढई )    १२) बाळाराम गौऱ्या पाटील ( अपक्ष, चिन्ह चिमणी )   १३) श्री बाळाराम महादेव पाटील (अपक्ष, चिन्ह माईक).

१८९- कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये एकूण १३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ०४ उमेदवारांनी माघार घेतली असून आता ०९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे.

१) थोरवे महेंद्र सदाशिव ( शिवसेना, चिन्ह धनुष्यबाण )  २) नितीन नंदकुमार सावंत ( शिवसेना उबाठा, चिन्ह मशाल ) ३) श्रीराम बळीराम महाडिक ( बसपा, चिन्ह हत्ती )  ४) जाविद आकदस खोत ( अपक्ष, चिन्ह बॅट )  ६ ) महेंद्र लक्ष्मण थोरवे ( अपक्ष, चिन्ह भालाफेक ) ६) विशाल विष्णू पाटील ( अपक्ष, चिन्ह एअर कंडिशनर )  ७) सुधाकरभाऊ परशुराम घारे (अपक्ष, चिन्ह ऑटोरिक्षा ) ८) सुधाकर यादवराव घारे ( अपक्ष, चिन्ह ट्रक )  ९) सुधाकर शंकर घारे ( अपक्ष, चिन्ह ट्रम्पेट ).

१९० – उरण विधानसभा मतदार संघामध्ये एकूण १६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ०२ उमेदवारांनी माघार घेतली असून आता १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे.

१) मनोहर  गजानन  भोईर ( शिवसेना, उबाठा,  चिन्ह  मशाल )    २)  महेश  बालदी   ( भारतीय    जनता  पार्टी,  चिन्ह  कमळ ) ३) ॲड. सत्यवान पंढरीनाथ भगत ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना, चिन्ह रेल्वे इंजिन )  ४) सुनील मारुती गायकवाड ( बहुजन समाज पार्टी, चिन्ह हत्ती )  ५) कृष्णा पांडुरंग वाघमारे (ऑल इं‍डिया फॉरवर्ड ब्लॉक, चिन्ह सिंह ) ६) प्रीतम जे. एम.  म्हात्रे ( पिझंटस अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया,  चिन्ह शिट्टी ) ७) महेश गणपत कोळी  ( लोकराज्य  पार्टी,  चिन्ह  जहाज  )  ८)  कुंदन  प्रभाकर  घरत ( अपक्ष, चिन्ह बॅट ), 9) निलम मधुकर कडू (अपक्ष, चिन्ह ट्रम्पेट) १० ) प्रीतम धनाजी म्हात्रे ( अपक्ष, एअर कंडिशनर ) ११ ) प्रीतम बळीराम म्हात्रे ( अपक्ष, चिन्ह कपाट )   १२ ) बाळकृष्ण धनाजी घरत ( अपक्ष, चिन्ह किटली ), १३ ) मनोहर भोईर ( अपक्ष, चिन्ह नरसाळे )  १४) श्रीकन्या तेजस डाकी ( अपक्ष, चिन्ह गॅस सिलेंडर ).

१९१ – पेण विधानसभा मतदार संघामध्ये एकूण १५  उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते.  त्यापैकी ०८  उमेदवारांनी माघार घेतली असून आता ०७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे.

१) अनुजा  केशव  साळवी  ( बहुजन   समाज  पार्टी, चिन्ह  हत्ती )  २)  प्रसाद दादा  भोईर ( शिवसेना,  उबाठा,  चिन्ह मशाल )  ३) रविशेठ पाटील ( भारतीय जनता पार्टी, चिन्ह कमळ )  ४) अतुल नंदकुमार म्हात्रे ( पिझंटस अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया, चिन्ह शिट्टी)  ५ ) देवेंद्र मारुती कोळी ( वंचित बहुजन आघाडी चिन्ह गॅस सिलेंडर ) ६) मंगल परशुराम पाटील ( अभिनव भारत पार्टी, चिन्ह माईक )  ७)  विश्वास मधुकर बागुल ( अपक्ष, चिन्ह इस्त्री ).

१९२-अलिबाग विधानसभा मतदार संघामध्ये एकूण २३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ०९ उमेदवारांनी माघार घेतली असून आता १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे.

१) अनिल बबन गायकवाड ( बहुजन समाज पार्टी, चिन्ह हत्ती )  २) महेंद्र हरी दळवी ( शिवसेना, चिन्ह धनुष्य बाण ) ३) श्रीमती चित्रलेखा नृपाल पाटील ऊर्फ चिऊताई ( पिझंटस अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया, चिन्ह शिट्टी )  ४) अजय श्रीधर म्हात्रे ( अपक्ष, चिन्ह हार्मोनियम ) ५) अमर रविंद्र फुंडे (अपक्ष, चिन्ह रुम कुलर ) ६) आनंद रंगनाथ नाईक ( अपक्ष, चिन्ह टायर्स )  ७) दिलीप गोविंद भोईर ( अपक्ष, चिन्ह बॅट ) ८) दिलीप विठ्ठल भोईर ऊर्फ छोटम शेठ  ( अपक्ष, चिन्ह बॅटरी टॉर्च ) ९) महेंद्र दळवी ( अपक्ष, चिन्ह विजेचा खांब ) १०) महेंद्र दळवी ( अपक्ष, चिन्ह सायकल पंप ) ११ )  महेंद्र  दळवी, ( अपक्ष, चिन्ह मोत्यांचा हार ) १२) मंदार एकनाथ गावंड ( अपक्ष, चिन्ह दूरदर्शन ) १३)  श्रीनिवास सत्यनारायण मटपरती  ( अपक्ष, चिन्ह रोड रोलर ) १४ ) सुभाष ऊर्फ पंडित पाटील ( अपक्ष, चिन्ह ऑटोरिक्षा ).

१९३ – श्रीवर्धन विधानसभा मतदार संघामध्ये एकूण १३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ०२ उमेदवारांनी माघार घेतली असून आता ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे.

१) अदिती सुनिल तटकरे ( नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, चिन्ह घड्याळ )  २ ) अनिल दत्ताराम नवगणे ( नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी, श. प. चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस )  ३) अश्विनी उत्तम साळवी ( बहुजन समाज पार्टी, चिन्ह हत्ती )  ४) फैजल अब्दुल अजीज पोपेरे ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना, चिन्ह रेल्वे इंजिन ),  ५) अनंत बाळोजी गीते ( अपक्ष, चिन्ह ग्रामोफोन ),  ६ ) अशरफ खान दादाखान पठाण ( अपक्ष, चिन्ह चालण्याची काठी ), ७) कोबनाक कृष्णा पांडुरंग ( अपक्ष, चिन्ह बॅट ), ८) मोहम्मद कासीम बुरहानुद्दीन सोलकर ( अपक्ष, चिन्ह खाट ),   ९ ) युवराज प्रकाश भुजबळ ( अपक्ष, चिन्ह गॅस सिलेंडर ),  १० ) राजाभाऊ  ठाकूर   ( अपक्ष, चिन्ह लिफाफा ), ११) संतोष तानाजी पवार ( अपक्ष, चिन्ह ट्रम्पेट ).

१९४ – महाड विधानसभा मतदार संघामध्ये एकूण ०८ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी ०३ उमेदवारांनी माघार घेतली असून आता ०५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे.

१) अमृता अरुण वाघमारे ( बहुजन समाज पार्टी, चिन्ह हत्ती ),  २) गोगावले भरत मारुती ( शिवसेना, चिन्ह धनुष्यबाण ),  ३) स्नेहल माणिक जगताप ( शिवसेना, उबाठा, चिन्ह मशाल ), ४ ) आनंदराज रवींद्र घाडगे ( वंचित बहुजन आघाडी, चिन्ह गॅस सिलेंडर )  ५) प्रज्ञा लक्ष्मण खांबे ( अपक्ष, चिन्ह चिमणी ).

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये