तिळगुळ घ्या गोड.. गोड.. बोला..
मकर संक्रांती निमित्त म्हसळा तालुका सुतार समाज्याच्या वतीनी तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम

प्रतिनिधी – संतोष उध्दरकर ( म्हसळा ) दि. १४ जाने रोजी म्हसळा तालुका सुतार समाज्याच्या वतीने दर वर्षी प्रमाणे यंदा ही मकर संक्रांती निमित्ताने तिळ गुळ वाटपाचा कार्यक्रम घेऊन प्रत्येकाला गळा भेट करून तिळगुळ देऊन तिळगूळ घ्या आणि गोडगोड बोला असे प्रेम भावनेने बोलून मकर संक्रांती च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सुतार समाज अध्यक्ष दत्तात्रय सुतार यांनी बोलतांना सांगितले की आम्ही हा तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करून एकोपा राहण्याचा व प्रेम भावनेचा संदेश देण्याचा प्रयत्न करतो व काही हेवेदावे असतील तर या दिवशी तिळगूळ देऊन हा प्रेमाचा गोडवा असाच रहावा हेच या मकर संक्रांती निमित्त आमचे सांगणे असते.
यावेळी उपस्थित अध्यक्ष दत्ता सुतार, उपाध्यक्ष दतात्रेय सुतार, सचिव संदीप कार्लेकर,खजिनदार राजु सुतार, आमशेत विभाग अध्यक्ष प्रकाश म्हाप्रळकर, आमशेत चे सुरेश सुतार, पांडुरंग सुतार, दतात्रेय उध्दरकर,जनार्दन सुतार, बाळकृष्ण सुतार, नथुराम सुतार, संदीप सुतार, सुनिल सुतार, सुरेश सुतार, श्रीधर पांचाळ, जितु सुतार, सचिन सुतार, गजानन सुतार, कमलेश सुतार, अशोक सुतार, तसेच समस्त सुतार समाज उपस्थित होते.