अंबर्ले येथील जलजिवन योजना प्रगती पथावर – सिताराम उभारे.*
रोहिदास नगर / गोरेगांव ( प्रतिनिधी)

अंबर्ले येथील जलजिवन योजनेचे काम प्रगती पथावर आहे. 30 टक्के काम झालं असुन उर्वरीत काम सुधारीत अंदाजपत्रकाच्या मंजुरीनंतर पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती अंबर्ले येथील उद्योजक सिताराम उभारे यांनी दिली आहे.
अंबर्ले येथील जलजिवन योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली असून ग्रामस्थानी उपोषणाचा इशारा दिल्याने अंबर्ले येथील प्रसिद्ध उद्योजक सिताराम उभारे यांनी माहिती देताना सांगितले की, जलजिवन योजनेचे काम चालु असताना योजनेमध्ये असणाऱ्या तफावतीमुळे काम करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. योजनमध्ये अंबर्ले उभारे वाडी येथील अंतर्गत जुनी पाईप लाईन आहे ती वापरावी असे आहे परंतु जुन्या पाईपलाईनला ३० वर्षाहून अधिक काळ झाला असुन सिमेंट व लोखंडी पाईप असल्याने गंज व पकडून ती नादुरुस्त आहे त्यामुळे मी ही बाब आमदारांच्या निर्दशनास आणून दिले असुन आमदारांच्या शिफारसीने सुधारीत अंदाजपत्रक मंजुरी करीता शासनाकडे पाठविले आहे.
उभारे यांनी पुढे बोलताना जलजिवन योजनेचे काम अपुर्ण असताना उभारे वाडीतील किशोर उभारे यांनी ग्रामपंचायत तसेच पाणीपुरवठा विभाग यांची कोणतीही परवानगी न घेता वैयक्तिक रित्या विहिरीमध्ये पंप बसविला आहे त्यामुळे याप्रकरणी संबंधित महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी व संबंधित व्यक्ती यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणणे, ढवळाढवळ करणे किंवा वैयक्तिक रित्या पंप बसविल्याबाबत गुन्हा दाखल करण्याकरिता पाणी पुरवठा विभाग अलिबाग यांच्याकडून लेखी पत्र घेण्याची मागणी त्यांनी ग्रामसभेत केल्याची माहिती देखील त्यांनी दिली तसेच संबंधित उभारे वाडी येथील काही ग्रामस्थांनी योजनेच्या ठेकेदाराविरोधात बातमी देण्यापुर्वी पाणी पुरवठा कमिटी सोबत चर्चा करुन पाणीपुरवठा विभागाकडून या योजनेचे काम पुर्ण करण्यासाठी सुधारीत अंदाज पत्रक मंजुर करुन करुन घेणे आवश्यक होते परंतु ग्रामस्थांनी तसे न करता बातमी देऊन ठेकेदाराला त्रास देऊन बदनामी केली त्यामुळे ठेकेदार यांच्या होणाऱ्या नुकसानाला संबंधित उभारे वाडीतील काही ग्रामस्थ आहेत त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार देणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
उभारे यांनी पुढे प्रश्न उपस्थित करताना म्हणाले की, उभारे वाडीतील ग्रामस्थ कोणाच्या विरोधात उपोषण करणार आहेत आमदार भरतशेठ गोगावलेंच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली गावातील कामे मंजुर झालीत शिवाय त्यांच्याच शिफारशीने सुधारीत अंदाजपत्रक मंजुरी करिता शासनाकडे पाठविला आहे. उपोषण कर्त्यांनी मंजुरी घ्याचची की नाही याचा देखील खुलासा करावा तसेच जुन्या पेयजलयोजने संदर्भात देखभाल दुरुस्तीचे काम हे पाणी पुरवठा कमिटी करित असते याची नोंद जिल्हा प्रमुख यांनी घेणे गरजेचे आहे असा टोला देखील यावेळी सिताराम उभारे यांनी लगावला.