Join WhatsApp Group
आपला जिल्हा

माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते द्रोणागिरी युवा महोत्सवाचे उद्घाटन

प्रतिनिधी - विठ्ठल ममताबादे ( उरण )

उरण – द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन च्या २४ व्या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दिनांक २० डिसेंबर रोजी बोकडविरा येथील मैदानावर माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष महादेव घरत यांनी केले. सदर उद्घाटन समारंभास राजमाता,राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वडील लखुजी जाधवराव यांचे वंशज ॲड रणजित जाधवराव,आवाज महामुंबईचा चॅनेल चे संपादक मिलिंद खारपाटील, पोलादपूर नगरपंचायत चे नगरसेवक शिवराज पार्टे, पोलादपूर क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष नीलेशदादा कोळसकर, नरवीर तान्हाजी मालुसरे यांचे मामा स्वराज्याचे मामा सुभेदार शेलार मामा यांचे वंशज दिपक शेलार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळ चे प्रमुख सरनौबत पिलाजी गोळे यांचे वंशज मनोहर गोळे, सुभेदार ज्योत्याजी केसरकर यांचे वंशज आदेश केसरकर, जेएनपीटी बंदर विभागाचे माजी ट्रस्टी एस सी मिश्रा साहित्यिक पुंडलिक म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैशाली घरत, ब्रह्मा कुमारी उज्ज्वला दीदी आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीस द्रोणागिरी मंदिरातून ज्योत मैदानात आणत या ज्योतीने मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते भव्य ज्योत प्रज्वलित करण्यात आली. ध्वजवंदन, राष्ट्रगीत, खेळाडूंना शपथ, मार्च पास आणि यानंतर दोन दिवसांपूर्वी समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या ना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी महादेव घरत आणि द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन च्या सर्व सदस्यांचे कौतुक करून रायगड जिल्ह्याच्या कला, क्रीडा ,सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्राला अत्युच्च शिखरावर नेण्यासाठी प्रयत्न करीत असल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले. याप्रसंगी माऊली घोड्याचे चित्तथरारक प्रात्यक्षिक, गतिमंद मुलांकडून सादर केलेला अफजलखान वधाचा प्रयोग सर्वांना आवडला. २० ते २४ डिसेंबर दरम्यान चालणाऱ्या या महोत्सवात १४० हून अधिक क्रीडा प्रकारात १० हजाराहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील काही व्यक्ती आणि संस्था अशा ३६ जणांचा रायगड जिल्ह्यास्तरीय द्रोणागिरी भूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये शिवमुद्रा प्रतिष्ठान, सुजय प्रतिष्ठान, डॉ. विजय कोकणे, डॉ स्वरांजली गायकवाड, आपले साम्राज्य च्या संपादिका सीमा मोरे, साहित्यिक म. वा.  म्हात्रे, आदर्श शिक्षिका चैताली म्हात्रे,कवी अजय शिवकर यांचा समावेश आहे.द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे शिवेंद्र म्हात्रे, भरत म्हात्रे, दिलीप तांडेल प्रवीण घरत, जयेश घरत, संजय होळकर, दीपक घरत, विजय पाटील,नयन घरत, अरुण द म्हात्रे , संजीव पाटील, एन एम म्हात्रे याचबरोबर कार्यकारिणी चे इतरही सदस्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत. सदर उद्धाटन समारंभाच्या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन नितेश पंडित आणि दर्शना माळी यांनी केले.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये