Join WhatsApp Group
ताज्या घडामोडी

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत उरण मधील रोहित शरद घरतने पटकाविले कास्य पदक; सर्व स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव

प्रतिनिधी –  विठ्ठल ममताबादे ( उरण ) ५० व्या गोल्डन ज्यूबिली युनिव्हरसरी इंटरनॅशनल टूर्नामेंट अँड ट्रेनिंग कॅम्प २०२४ अंतर्गत ११ ते १४ डिसेंबर २०२४ दरम्यान मेणारा, PT ८०, कौलालुमपूर, मलेशिया येथे गोशीन रियू कराटे असोसिएशन ( इंडिया ) तर्फे आयोजीत केलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत ८४ किलो व त्या वरील वजनी गटामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे उरण तालुक्याचे सुपुत्र रोहित शरद घरत यांनी उत्कृष्ट कामगिरी करत कास्य पदक पटकाविले आहे.


मलेशिया येथे आयोजित केलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विविध देशातील एकूण २२० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. गोशीन रियू कराटे असोसिएशन (इंडिया )या संघटनेतर्फे आयोजित या स्पर्धेत उरण तालुक्यातील नवापाडा – दिघोडे येथील रोहित घरत यांनी दमदार कामगिरी करत कास्य पदक मिळवून भारताचे नाव उज्वल केले आहे. सदर स्पर्धेसाठी रोहित घरत यांना सिहान. के. वसंतन, गोपाळ म्हात्रे, शिहान राजु गणपत कोळी, बळीराम घरत, राजू मुंबईकर, निकेश पाटील, राकेश म्हात्रे व आई वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. परदेशात जाऊन भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या रोहित शरद घरत यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच राजू गणपत कोळी इंडिया प्रेसिडेंट यांना सिक्स डान ब्लॅकबेल्ट प्रदान कण्यात आला. त्यांच्यावरही सर्व स्तरातून शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये