माणगांवचे माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर भोनकर यांचे निधन !
प्रतिनिधी - अरुण पवार ( माणगांव )

माणगांव – माणगांवचे व्यापारी सुभाषशेठ भोनकर यांचे धाकटे बंधू व माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य मीनल भोनकर यांचे पती माणगांवचे माजी ग्रामपंचायत सदस्य कै. मधुकर चंद्रकांत भोनकर यांचे सोमवार दि.७ ऑक्टोबत २०२४ रोजी दुपारी १२:१५ वाजता दीर्घ आजाराने माणगाव येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, एक मुलगा, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने भोनकर कुटुंबियांबरोबरच, मित्रपरिवार व माणगावकरांवर शोककळा पसरली आहे.
कै. मधुकर चंद्रकांत भोनकर हे माणगांव तालुक्यातील शांत व सय्यमी स्वभावाचे व्यक्तिमत्व होते. सर्वांशी त्यांचे ऋणानुबंधाच्या संबंध असल्याने ते बहुजन समाजात सर्वाना परिचित होते. त्यांनी गेली अनेक वर्ष हॉटेल व लॉन्ड्रीचा व्यवसाय केला. एक प्रसिद्ध व्यापारी म्हणून यांचे माणगाव तालुक्यासह रायगड जिल्ह्यात विशेष असे नाव होते. माणगाव ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यांनी ५ वर्षे चांगली कामे करून आपल्या वॉर्डाचा विकास साधण्याचा आपल्या कारकिर्दीत प्रामाणिकपणे प्रयत्न केला. गेली काही महिन्यांपासून ते आजारी होते. सोमवारी माणगांव येथे त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्या निधनाची माहिती माणगांवसह रायगड जिल्ह्यात सर्वाना समजताच अनेकांनी त्यांच्या माणगांव निजामपूर रोड मार्गावरील निवासस्थानी येऊन त्यांचे अंत्य दर्शन घेऊन भोनकर कुटुंबियांचे सांत्वन केले. माणगाव येथील स्मशान भूमीत यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जन समुदाय अंत्यविधीला उपस्थित होता.