एस एस निकम हायस्कूल लोणेरे येथे रस्ता सुरक्षा अभियान संदर्भात निबंध स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधी - राम भोस्तेकर ( लोणेरे )

लोणेरे – वाहतूक शाखा गोरेगाव व एस एस निकम हायस्कूल लोणेरे यांच्या संयुक्त विद्यमानाने रस्ता सुरक्षा अभियान 2025 साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला गोरेगाव पोलीस ठानेचे सहा.पोलिस निरीक्षक सुर्वे सो, माणगाव ट्राफिक डिव्हिजनचे सपोनी लाड मॅडम, ट्रॅफिक पोलिस उप निरीक्षक महाडिक, पो. कॉ. अमोल दळवी यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वाहतुकी बाबत व रस्ते सुरक्षा बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच सायबर सुरक्षा याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले रस्ता सुरक्षा या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली या कार्यक्रमाला उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका दर्शना चावरेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर खाडे उपस्थित होते दरम्यान सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी रस्ता सुरक्षा अभियानात उपस्थित सर्व प्रकारच्या वाहन चालकांना गुलाबपुष्प व पॅम्प्लेट देऊन स्वागत करण्यात आले तसेच वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व पटवून दिले, तसेच वाहतुकीची नियम न पाळल्यामुळे कोणत्या प्रकारच्या कलमानुसार कोणती कारवाई केली जाते, याबाबतची महत्वाची माहिती वाहनचालकांना देण्यात आली.