गोरेगांव बौद्ध विहार येथे महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन.
महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीचे नागरिकांना दर्शन

गोरेगांव – पंचशील बौद्ध जन सेवा संघ गोरेगाव विभाग यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील संबोधी विहार येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी स्मारकात जातं करण्यात आल्या आहेत. त्या ६ डिसेंबर, २०२४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाला संबोधी विहारात पवित्र अस्थी दर्शनाला ठेवण्यात आल्या होत्या. याठिकाणी अनेकांनी येवून दर्शन घेतले. रायगड जिल्ह्यामध्ये एकमेव गोरेगाव येथे पंचशील बौद्ध जन सेवा संघाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी जतन करण्यात येत आहेत. पंचशील बौद्ध जन सेवा संघ रायगड जिल्ह्यामध्ये एकमेव नावजलेली संस्था आहे.
पंचशील बौद्ध जन सेवा संघ गोरेगाव विभागचे अध्यक्ष आयु. विकास दादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ६ डिसेंबर, २०२४ रोजी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला बौध्दजन पंचायत समितीचे अध्यक्ष आयु चंद्रमणी साळवी, प्राध्यापक सोनवणे, म्हसळा तालुका सचिव आयु रुपेश गमरे, विश्वस्त सचिव संदीप साळवी, विश्वस्त डॉ. दिलीप साळवी, तुकाराम महाडिक महिला जिल्हा अध्यक्ष अस्मिता जाधव, पंचशील महिला सेवा संघाच्या अध्यक्षा सुप्रिया साळवी, यांनी अभिवादन करून श्रध्दांजली अर्पण केली.
या कार्यक्रमाला मुंबई संघाचे कार्याध्यक्ष आयु. मुकुद पवार, आयु. नीलेश महाडिक, शैलेश साळवी, विजय जाधव, हिरामण महाडिक, आयु. रामदास जाधव, लक्ष्मण जाधव , वसंत जाधव, सुनील शिंदे, सौ. रेश्मा साळवी, सौ. सुवर्णा हाटे, सौ. सुवर्णा अहिरे, सुनंदा मोरे, अपर्णा लोखंडे, प्रिया लोखंडे, सौ. विजया गायकवाड या महिला संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी चे दर्शन घेवून श्रद्धांजली अर्पण केली.