आपला जिल्हा
पोलादपूर- मोरगिरी रस्त्यावर झाड पडल्याने काही वेळ वाहतूक ठप्प, स्थानिकांच्या मदतीने झाड केले बाजूला
प्रतिनिधी - देवेंद्र दरेकर (पोलादपुर)

जिल्ह्यामध्ये रविवारी प्रशासनाकडून रेड अलर्ट सांगण्यात आला होता. त्यानुसार महाड पोलादपूर तालुक्यात रविवारी पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली होती त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यातच रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पोलादपूर तालुक्यातील पोलादपूर- मोरगिरी या मुख्य रस्त्यावर दळवी फार्म हाऊसच्या समोर एक मोठे झाड पडल्याची घटना घडली आहे. त्यामुळे काही काळ दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे दिनेश दरेकर, उमेश सपकाळ यांनी प्रशासनाला तात्काळ कळवले
यानंतर स्थानिकांच्या मदतीने सदरचे झाड तोडून बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.