शिक्षक पतसंस्थेच्या शतकपूर्ती वाटचालीची इतिहासात नोंद होईलः आदितीताई तटकरे
प्रतिनिधि - किरण बांधणकर ( पेण)

रायगड जिल्ह्याचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा या पेण प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या नावाची नोंद होईल असा हा शतकपूर्तीवर्ष प्रगतीचा आलेख गाठलेला आहे ती नोंद निश्चित होईल हा माझा विश्वास आहे. असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी पेण येथे केले.
पेण प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन पेण येथिल आगरी समाज हॅाल मधे करण्यात आले होते या वेळी महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे, आमदार रविशेट पाटील, माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष नीलिमा पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पेण रा.जि. प उप शिक्षणाधिकारी शेडगे, पेण गटशिक्षणाधिकारी अरुणा मोरे, उप शिक्षणाधिकारी धामणकर, पतसंस्थेचे अध्यक्ष मोहन भोईर, उपाध्यक्ष उज्ज्वला कनोज, सचीव सोपान चांदे ,नितीन वर्तक राष्ट्रवादी काॅग्रेसचे पेण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष नरेंद्र ठाकुर, पेण तालुका अध्यक्ष दयानंद भगत, संचालक मंडळ सर्वं आजी माजी सदस्य शिक्षक-शिक्षिका व बंधू-भगिनी यांची उपस्थिती होती.
प्रारंभी पतसंस्थेच्या इमारती मधे संस्थापक अध्यक्ष ना. भी. दाबके गुरुजी यांचे तैलचित्र अनावरण आदिती तटकरे व आमदार रविशेट पाटील यांनी केले.
स्वातंत्र्य पूर्व काळात एखादी संस्था स्थापन झाली, दाबके गुरुजी यांनी स्थापन केलेली पतसंस्था नावारुपास आली आसुन या पतसंस्थेचे भाडवल २१८ कोटी वर आहे संस्थेचा प्रगतीचा अहवाल उंचावत आसुन पतसंस्थेचे काम कौतुकास्पद आसुन आई, वडीलांनंतर मानवी समाज जीवनाला आकार ज्ञान देणारे शिक्षक असतात असे या वेळी बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
दाबके गुरुजींनी स्थापन केलेली पतसंस्था आज विस्तारली आहे एकुण ३२०० सभासद या पतसंस्थेच्या आहेत. संस्थेचे भाडवल २१८कोटी असुन सगळे शिक्षक एकजुटीने काम करतात संस्थेच्या सभासदाचा मुत्यु झाला तर घेतलेले वीस लाखांपर्यंत कर्ज माफीचा निर्णय महत्त्वाचा असल्याचे रायगड जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमा पाटील यांनी सांगितले.
यावेळी सुंदर शाळा अभियान , प्राविण्य प्राप्त शिक्षकांचा मान्यवरांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते करण्यात आले तसेच संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.