नराधमाला फाशी द्या… शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या समस्त महिला आघाडीकडून आंदोलन.
प्रतिनिधी - ओमकार नागांवकर (अलिबाग)

अलिबाग : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराने महाराष्ट्र हादरला आहे. तीन ते चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील स्वच्छतागृहातील स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. त्या घटनेचा तीव्र निषेध करत दि.२१ रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय अलिबाग येथे आंदोलन करण्यात आले.
अलिबाग तालुक्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या समस्त महिला आघाडी कडून बदलापूर येथे लहान मुलीवर अत्याचारा विरोधात निषेध करीत जिल्हा अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना त्याबाबत निवदेन देत सदर प्रकारातील गुन्हेगारास कठोरातील कठोर शिक्षा व्हावी जेणे करून असे प्रकार पुन्हा पुन्हा होणार नाहीत आणि असे प्रकार करू पाहणाऱ्या नराधमास दहशत बसेल अशी मागणी या निवेदनात करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, तालुका प्रमुख शंकर गुरव, उपजिल्हा संघटक अजित पाटील, विभाग प्रमुख गिरीश शेळके, प्रवक्ते धनंजय गुरव, महिला आघाडी विधानसभा संघटिका तनुजा पेरेकर, तालुका संघटिका स्नेहल देवळेकर, उपतालुका संघटिका वंदना पाटील, मापगाव विभाग संघटिका निवेदिता गावंड, उपविभाग संघटिका तृप्ती जावकर आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.