Join WhatsApp Group
सामाजिक

माणगांवातील ओम सिद्धी साई दिंडी कोकण श्रीक्षेत्र शिर्डीकडे रवाना.

माणगांवकरांच्या उपस्थितीत शेकडो साईभक्त शिर्डी पदयात्रा पालखी सोहळ्यात सहभागी.

प्रतिनिधी –  संतोष सुतार  ( माणगांव )  ओम सिद्धी साई दिंडी कोकण हे साईभक्त गेली १३ वर्ष आपली परंपरा जपत नानोरे  ते  शिर्डी अशा पदयात्रेचे नियोजन करीत असतात याही वर्षी पदयात्रेचे नियोजन करण्यात आले असून या पदयात्रेचा प्रारंभ आज दि.  २ जानेवारी २०२५ रोजी  सकाळी १० वाजता नानोरे येथील साई मंदिर येथून सुरुवात करण्यात आली. पदयात्रेला सुरवात करण्यापुर्वी ग्रामदैवत जनी बापूजी मंदिराला प्रदक्षिणा देत व नानोरे गावाला प्रदक्षिणा देत ही पालखी पदयात्रा सुरुवात झाली.

या परंपरागत दिंडी चे नियोजन संस्थापक अशोक वाढवळ यांच्या प्रेरणेने साई चरणरज समाधान उतेकर,कान्हा महाराज, कार्यकारिणी अध्यक्ष सुभाष उतेकर, उपाध्यक्ष गजानन वाढवळ, चिटणीस महेंद्र पाटोळे,सहचिटणीस भारत जाधव,पालखी सोहळा अध्यक्ष संतोष खडतर, उपाध्यक्ष महेश शिर्के,मराठी उद्योजक सुभाष(दाजी)दळवी, खजिनदार मनोज पोवार,उपखजिनदार परेश म्हात्रे, सल्लागार दीपक थळकर,मिलिंद साखरे,सागर कोळवनकर,रमेश बक्कम यांच्या सह माणगाव तालुक्यातील बहुसंख्य साईभक्तांनी केले आहे.

ही पदयात्रा मुंबई गोवा महामार्गवरून श्री दत्त मंदिर माणगाव – श्री साई मंदिर विकास कॉलनी ते दशरथ गावडे यांचे निवासस्थान व त्यांनतर निजामपूर येथे रात्री वस्ती अशी पदयात्रा श्री क्षेत्र शिर्डी कडे रवाना होणार आहे. सुमारे ३०० किमी पायी प्रवास असणाऱ्या पदयात्रेत सुमारे ३०० साईभक्त सामील आहेत तर त्यापैकी १७५ साईभक्त पायी प्रवास करणार आहेत. या पदयात्रेचा प्रवास सुमारे ८ दिवसांचा असून प्रतिदिन ४० किमी अंतर साईभक्त कापणार आहेत. ही साईपालखी निजामपूर नंतर ३ जानेवारी रोजी डोंगरवाडी विंझाई देवी मंदिर ताम्हिणी. ४ जानेवारी मुळशी पौड, ५ जानेवारी पौड ते देहू, ६ जानेवारी राजगुरू नगर अवसर फाटा मंचर, ७ जानेवारी आळेफाटा धारगाव, ८जानेवारी साकुरफाटा ते संगमनेर, ९ जानेवारी कवठे कमळेश्वर ते नांदूरखी, १० नांदूरखी ते श्री क्षेत्र साईमंदीर शिर्डी असा असणार आहे. या पालखी च्या मिरवणुकीचे खास आकर्षण असते ते पद यात्रेत सामील झालेला नाचणारा घोडा.!

दरवर्षी पेक्षा या वर्षी ओम सिद्धी साईदिंडी कोकण माणगावला हजारो माणगांवकर आणि शेकडो साईभक्त उपस्थित होते माणगाव तालुक्यातील बाजारपेठ, विकासकॉलनी, साईनगर, दत्तनगर, गणेशनगर या विभागातील आबालवृद्धानी पालखीचे दर्शनघेत पुष्पसुमनानी स्वागत केले तसेच आदर्श समता नगर माणगांव विकास कॉलनी तसेच माणगांव शहरातील साईनगर येथे सुरेश खाडे यांच्या निवासस्थाना समोर साईनगर मधील असंख्य भाविकांनी पदयात्रेतील पालखीचे दर्शन घेत मनोभावे पूजा केली.

या पालखी दरम्यान पत्रकारांशी बोलताना  श्री साई पालखी पदयात्रा सामाजिक एकोपा टिकावा, समाज सलोखा निर्माण व्हावा,सर्वधर्म सहिष्णुतेची शिक्षण समाजात रुजावी, साईबाबांची महती व चमत्कार जनमानसात रुजावे हा उद्देश साईदिंडी च्या माध्यमातून आम्ही समाजात रुजवण्याचा श्री साई प्रेरणेने प्रयत्न करत असतो असे  मत साईचरणरज समाधान उतेकर व पालखी सोहळा अध्यक्ष संतोष खडतर यांनी व्यक्त केले.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये