कृषी विभागाकडून उद्योजिका व कुशल महिला शेतकरी म्हणून ज्योती पायगुडे सन्मानित.
प्रतिनिधी - किशोर पितळे ( तळा )

तळा – महिलांची शेती क्षेत्रातील भूमिका महत्त्वाची आहे त्यांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून राष्ट्रीय महिला किसान दिनाचे औचित्य साधून यशस्वी महिला उद्योजीका व कुशल महिला शेतकरी म्हणून गिरणे ग्रामपंचायत माजी सरपंच आणि उद्योजीका ज्योती कैलास पायगुडे यांचा सन्मान कृषी अधिकारी आनंद कांबळे यांच्या हस्ते शाल – श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन कृषी कार्यालय तळा येथे त्यांचा सन्मान करण्यात आला.
ज्योती पायगुडे यांनी कृषी विभागा मार्फत केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महिला किसान धोरणास अनुसरून शेती परिवर्तनात महिला उद्योजकांची भूमिका या धर्तीवर तळा तालुक्यात यशस्वी महिला उद्योजक व कुशल महिला शेतकरी असल्याने कृषी खात्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. महिला आता प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर स्वत:ला सिद्ध करीत आहेत.नोकरीत सर्व क्षेत्रांत आरक्षणामुळे मिळालेल्या संधीमुळे उच्चपदी सेवा करीत आहेत.चूल आणीत मुलं या पलीकडे उबांरठ्याबाहेर जाऊन विश्वाला गवसणी घातली जात आहे.घर संसाराची कामे सांभाळून शेतकरी महिला उत्कृष्टपणे शेती व शेतीपूरक व्यवसायात जबाबदार पार पाडत आहेत. अशा महिला शेतकऱ्यांचे कृषी खात्याकडून सन्मान होत आहे याचे कौतुक होत आहे. त्याचबरोबर महिला किसानदिना निमित्ताने ज्योती पायगुडे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्यावर सर्व स्तरावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.