Join WhatsApp Group
आपला जिल्हामनोरंजनमहाराष्ट्रराजकीयव्यापारसामाजिक

राम कृष्ण हरी ग्रुपची अनोखी भ्रमंती ; विविध धार्मिक स्थळांना भेट देत केला अभ्यास.

प्रतिनिधी - विठ्ठल ममताबादे ( उरण )

उरण – निवृत्त प्राचार्य व इंजिनियर मित्रांनी राम कृष्ण हरी या ग्रुपच्या नावाने एका अनोख्या भ्रमंतीचे आयोजन केले होते. हि भ्रमंती  दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ ते १२ डिसेंबर २०२४ अशा एकूण १७ दिवसांची भारतातील पूर्व दक्षिणेकडील विविध राज्यांतील धार्मिक, ऐतिहासिक, भौगोलिक, औद्योगिक, ठिकाणांना भेटी देऊन या ग्रुपच्या सदस्यांनी निवृत्तीनंतर जीवनाचा मुक्त आनंद लुटण्याचा प्रयत्न केला.

राम कृष्ण हरी या ग्रुपच्या सेवानिवृत्त प्राचार्य सूरदास राऊत, प्राचार्य नाथा नाईक, प्राचार्य दिलीप पाटील, प्राचार्य अरुण घाग व इंजिनिअर बाळकृष्ण पाटील यांचा प्रवासाची सुरुवात रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिरनेरच्या महागणपतीचे दर्शन घेऊन प्रवासास सुरवात केली. महाराष्ट्रातील घृष्णेश्वर महादेव मंदिर ,पोहरादेवी, रेणुका माता मंदिर ( माहूरगड ) चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प. छत्तीसगडमधील भिलाई लोहपोलाद कारखाना, मैत्री बाग, मल्हारगड ( छत्तीसगड ) झारखंड मधील बाबा बैजनाथ ( देवधर ), वासुकींनाथ धाम. बिहारमधील गया, बोध गया, श्री विष्णुपद वेदी धाम, पश्चिम बंगालमधील गंगासागर, वेल्लूर मठ, व्हिक्टोरिया मेमोरियल, हावडा ब्रिज, काली माता मंदिर, दक्षिणेश्वर काली माता, कलकत्ता पोर्ट, हल्दीया पोर्ट, ईडन गार्डन, अंडरग्राउंड रेल्वे प्रवास. ओडिसामधील कोणार्क सूर्य मंदिर, चंद्रभागा बीच, गोल्डन बीच, जगन्नाथ पुरी, लिंगराज मंदिर, तारातारीणी माता मंदिर, आंध्रप्रदेशातील वराहनृसिह स्वामी मंदिर, कणका दुर्गा माता मंदिर, तेलंगणामधील रामोजी फिल्म सिटी, चारमिनार, श्रीशैल्यम मल्लिकार्जुन. महाराष्ट्रातील अक्कलकोट, मोरगाव, जेजुरी मार्गे पर तिचा प्रवास असा एकूण जवळजवळ ६००० कि. मी. एकूण १७ दिवसांचा फोर व्हीलर ने प्रवास करत एकदाही हॉटेलमध्ये कुठलाही पदार्थ न खाता सर्व साहित्य सोबत घेऊन सर्वांच्या परस्पर सहकार्याने जेवण तयार करून एक वेगळा अनुभव घेतला १० राज्यांतील प्रवास करून त्या त्या राज्यातील संस्कृतीचा अभ्यास करून प्रवासाची सांगता १२ डिसेंबर २०२४ रोजी पूर्ण करण्यात आली. या संपूर्ण प्रवासाचे नियोजन सूरदास राऊत सरांनी वेळोवेळी व्हाट्सअप ग्रुप वर चर्चा करून केली व इतर सर्वांनी प्रवासाची रूपरेषा आखून प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये