जिल्हापरिषद प्राथमिक उर्दू शाळा पुरार वनी येथे ” जलसा ए सिरतून नबी ” कार्यक्रम उत्साहात संपन्न
प्रतिनिधी - मंगेश मोरे ( पुरार )

पुरार – राज्यभरातील अनेक जिल्हापरिषद शाळा या कमी पट असल्याने बंद पडत आहेत तर बऱ्याच शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत परंतु १८७६ साली स्थापन झालेली माणगांव तालुक्यातील वनी पुरार येथील जिल्हापरिषदेची उर्दू शाळा परिसरातील सर्वात जास्त विध्यार्थ्यांचा पट असणारी जिल्हापरिषद शाळा म्हणून ओळखली जात आहे शिवाय प्रत्येकी वर्षे विध्यार्थ्यांच्या पटात वाढ देखील होत आहे.
रायगड जिल्हापरिषद उर्दू शाळा पुरार वनी येथे अनेक प्रकारच्या सामाजिक शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात, या वर्षी ही शनिवार १४ डिसेम्बर रोजी दुपारी तीन वाजता च्या सुमारास जिल्हापरिषद प्राथमिक उर्दू शाळा पुरार वनी येथे इस्लाम चे प्रेषित मोहम्मद यांच्या जीवन पद्धतीवर सिरतून नबी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून प्रेषित मोहम्मद यांच्या जीवन शैली वर उर्दू , मराठी व इंग्रजी भाषेत हम्द, नात व तकरीर अर्थात भाषणे करण्यात आली. जिल्हापरिषद प्राथमिक उर्दू शाळा पुरार वनी येथे कार्यक्रमा मध्ये भाग घेऊन योग्यता कौशल्य व धाडस दर्शविणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे तसेच कार्यक्रमाचे आयोजक, शाळेय व्यवस्थापन समिती व शिक्षक वर्गाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष मुफ्ती सऊद व उपस्थित अनेक मान्यवरांकडून विशेष कौतुक करण्यात आले. या कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या चिमुकल्या विध्यार्थ्यांना शाळेच्या वतीने बक्षीस देऊन गौरविण्यात ही आले. या कार्यकर्माचे अध्यक्ष मुफ्ती सऊद होते तर सूत्रसंचालन फैज सरखोत यांनी सांभाळले होते.
यावेळी कार्यकर्मासाठी मुफ्ती सऊद गोरेगाव पोलीस ठाणेचे कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक विलास सुर्वे, हारून वांगरे, इब्राहिम खतीब डॉ. मुदस्सीर खतीब,पुरार मोहल्ला अध्यक्ष उस्मान पोटे, असद फकी, पुरार ग्रामपंचायत सदस्य धिरज पवार, पोलीस यशवंत चव्हाण, सर्फराज उमलकर, दानिश बुरुड, मुस्तकीम नगरपाल, अब्दुल रशीद मुकादम,जफर वांगरे, जलील पाल, अनेक प्रतिष्ठित मान्यवर पुरार वनी येथील ग्रामस्थ, बहुसंख्य महिला, विध्यार्थी तसेच शाळेय व्यवस्थापन समिती व शिक्षक वर्ग हजर होते.