माणगांव मधील वक्रतुंड रेसिडेन्सी मध्ये महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन
डॉ. बाबासाहेब आंबेडरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन

गोरेगांव – महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो.यावेळी राज्यासह देशभरातील बाबासाहेबांचे लाखो अनुयायी दादर, चैत्यभूमी येथे एकत्र येतात. बाबा साहेबांना आदरांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे
या दिवशी भारत तसेच जगभरातील भिमसैनिक आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध मंदिर, विहारे, तसेच स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात. राजकीय नेते व इतर मंडळी बाबासाहेबांच्या सार्वजनिक ठिकाणच्या आंबेडकर स्मृतीस्थळांना वंदन करतात.
वक्रतुंड रेसिडेन्सी माणगावमध्ये देखील यंदा पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अश्विनी समेळ, रुपेश वाढवळ, देवेंद्र भोसले, प्राप्ती मोरे, उमेश वाचकावडे, भाग्येश कुलकर्णी, रुपाली कांबळे, रतिक्षा वाढवळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली.