माणगांव टि.एम.सी.काँलेज मध्ये ज्ञानज्योती साविञीबाई फुले जयंती साजरी
प्रतिनिधी - नंदकुमार चांदोरकर ( चांदोरे/माणगाव )

माणगाव – देशातील पहिल्या थोर महिला शिक्षिका स्ञी शिक्षणाच्या जननी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फूले यांची शुक्रवार दि ३ जानेवारी या दिवशी जयंती निमित्ताने विद्यार्थी मार्गदर्शन शिबीर व सत्कार समारंभ २०२५ हा कार्यक्रम गेली १७ वर्षे टि.एम.सी.काॅलेज साजरा करत असून या वर्षी देखील ज्ञान ज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्सव कार्यक्रम हा मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला
यावेळी माणगांव नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा व बांधकाम विभाग सभापती हर्षदा सुमित काळे, नगरसेविका तसेच महिला व बाल विकास सभापती सुविधाताई संतोष खैरे तसेच माणगांवच्या नामाकिंत मराठी उद्योजीका व समाजसेविका सुवर्णाताई जाधव, काॅलेजचे प्राध्यापक मोरे सर तसेच काँलेज विद्यार्थी विद्यार्थीनी वर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योग क्षेत्रातील सात महिलांचा यावेळी विषेश सत्कार करण्यात आला यावेळी रायगड इन्स्टिटय़ूट ऑफ आय. टि. माणगांव डाँ. अजय मोरे संचालिका अंकिता अजय मोरे यांची या क्रार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.