त्रितीय वर्धापन दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर
श्री रविप्रभा संस्थेचे काम कौतुकास्पद - माधव जाधव ( ग. वि.अधिकारी, म्हसळा )

प्रतिनिधी – संतोष उद्धरकर ( म्हसळा ) श्री रविप्रभा मित्र संस्था व म्हसळा डोळ्यांचे दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने डोळ्यांचे दवाखाना यांच्या त्रितीय वर्धापन दिनानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबीराच्या अध्यक्ष स्थानी म्हसळा तालुका गट विकास अधिकारी माधव जाधव उपस्थित राहुन त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले कि श्री रविप्रभा मित्र संस्थेचे काम कौतुकास्पद आहे, ही संस्था प्रत्येक विषयावर काम करते मग ते आरोग्य असो, शिक्षण, सामाजिक असो अशी एकमेव संस्था आहे जे या पद्धतीने काम करते, आणि नेत्र तपासणी शिबीर आयोजित करून खरच खूप चांगले काम केले आहे, कारण अनेक जणांना दृष्टी दोष असतो पण आर्थिक परिस्थिती मुळे त्यांना नेत्र शस्त्रक्रिया करू शकत नाही, या संस्थे व्दारे ही संधी उपलब्ध केली आहे, यासाठी या संस्थेचे खुप धन्यवाद देईन, तसेच डॉ. शंतनु डोईफोडे, डॉ. सलीम धलाईत यांनी देखील खूप छान मार्गदर्शन केले.
या नेत्र तपासणी शिबीरात म्हसळा तालुक्यातील शंभर हुन अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला, या मधील ३२ लाभार्थी यांची मोतीबिंदु नेत्र शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे असे नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. सलीम धलाईत यांनी सांगितले, तसेच ज्यांचे नंबर लागले आहेत त्यांना चष्मा वाटप करण्यात येईल असे देखील धलाईत यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष उद्धरकर यांनी केले, तर आभार नितीन रिकामे यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदस्य समीर लांजेकर, सुशांत लाड, नितीन रिकामे, सुजित काते यांनी अधिक मेहनत घेतली.
या वेळी उपस्थित म्हसळा तालुका गट विकास अधिकारी माधव जाधव, संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लाड,उपाध्यक्ष नरेश विचारे नेत्र शल्य चिकित्सक, माणगाव डॉ. शंतनु डोईफोडे, नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. नलीनी जाधव, नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. सलीम धलाईत, विस्तार अधिकारी खराडे, सचिव संतोष उध्दरकर, खजिनदार सुशांत लाड, संतोष घडशी, शांताराम निंबरे, शंकर कासार, दत्तात्रय लटके, नितीन रिकामे, समीर लांजेकर, सुजित काते, तुकाराम भेलेकर, प्रदिप सुतार, निशा पाटील, विशाल सायकर, कौस्तुभ करडे, परिचारीका ऋतुजा म्हात्रे, उर्मिला म्हात्रे, तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.