दैनिक सूर्योदय दक्षिण रायगड जिल्हा उप संपादक पदी संतोष उध्दरकर यांची नियुक्ती
प्रतिनिधी - नंदकुमार चांदोरकर ( चांदोरे/माणगाव )

माणगाव – ६ डिसें रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधुन दैनिक सूर्योदय कोकण आवृत्ती सभा माणगाव येथे कोकण आवृत्ती संपादक भरत सरपरे यांच्या अध्यक्षतेखाली नूकतीच संपन्न झाली, या सभेत अनेकांची पद नियुक्ती करण्यात आली, दक्षिण रायगड जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पहात असलेले संतोष उध्दरकर यांना यावेळी दक्षिण रायगड जिल्हा उप संपादक पदाची जबाबदारी देऊन त्यांची या पदी नियुक्ती करण्यात आली, यावेळी सर्व प्रतिनिधी यांनी उध्दरकर यांचे पूष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
संपादक भरत सरपरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवुन एवढी मोठी जबाबदारी सोपविली आहे ती जबाबदारी मी नक्कीच सार्थकी ठरवुन दाखवेन असे संतोष उध्दरकर यांनी सांगितले. यावेळी उपस्थित कोकण आवृत्ती संपादक भरत सरपरे, कार्यकारिणी संपादक अँड राकेश साळुंखे,उत्तर रायगड जिल्हा उप संपादक मंगेश यादव, उत्तर रायगड जिल्हा प्रतिनिधी नारायण म्हात्रे, रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी प्रशांत परांजपे, विशेष प्रतिनिधी नंदकुमार चांदोरकर, दक्षिण रायगड जिल्हा प्रतिनिधी कुणाल माळवदे, विशेष प्रतिनिधी कृष्णा भोसले, प्रसिद्धी प्रमुख लवेश साळवी, राजेद्र शिगवण, आदित्य मोहिते, मुकुंद बोर्ले, अमित बैकर, नितेश म्हात्रे, सोनावणे, उपस्थित होते.