न्यू इंग्लिश स्कुल म्हसळा येथे श्री स्वामी विवेकानंद सप्ताह सोहळा
प्रतिनिधी - संतोष उध्दरकर ( म्हसळा )

म्हसळा – दि. 12जाने रोजी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसळा विद्यालयात श्री स्वामी विवेकानंद सप्ताह निमित्त पुष्प पहिले रोजी श्री स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती कार्यक्रम साजरा करून रॅली काढण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन समीरजी बनकर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद सप्ताहामध्ये विविध स्पर्धेत सहभागी व्हावे यासाठी प्रोत्साहन देऊन शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून वडगाव हायस्कूल माणगावचे शिक्षक व कब,स्काऊट रोवर मास्टर रुपेश गमरे यांनी आपल्या मनोगत विद्यार्थ्यांनी 21व्या शतकात कशा पद्धतीने शिक्षण घेतले पाहिजे हे उदाहरणे देऊन पटवून दिले आणि त्याचबरोबर स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. शिक्षक मनोगतात प्रा.चव्हाण सर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाविषयी माहिती करून दिली व विद्यार्थी मनोगतमध्ये कु.त्रिशाला चव्हाण हिने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विषयी माहिती दिली तर काही विद्यार्थ्यांनी डॉ.बापूजी साळुंखे व राजमाता जिजाऊची वेशभूषा केली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक मोरे सर यांनी केले व प्रास्ताविकेत पाटील ई.सी यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची माहिती सांगितली आणि कार्यक्रमाचे आभार पर्यवेक्षक मांजरेकर सर यांनी मांडले या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक पाटील डी आर, उमरोटकर सुनील, दिलीप कांबळे, नंदकुमार गोविलकर, अमर करंबे, संतोष उध्दरकर, अनिल पोतदार,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष अजय करंबे व सहसचिव जयेश जाधव,माता पालक संघाच्या उपाध्यक्षा सौ.विधी साळुंखे व सहसचिवा सौ.वैशाली करंबे,म्हसळा पोलीस उप निरीक्षक रोहिणकर व हवालदार पालोदे सर ,सौ.जमदाडे मॅडम ,खुताडे मॅडम,वसावे सर,सहारे सर,गवळी सर,लेखनिक भायदे सर,आमले सर,आदी शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.