स्वदेस फाऊंडेशन कडून माणगाव तालुक्यातील खडकोली स्वप्नातील गाव म्हणून घोषीत
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर, तालुका स्थरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल शिक्षकांचा स्वदेश मार्फत सत्कार

प्रतिनिधी – राम भोस्तेकर ( लोणेरे ) स्वदेस फाऊंडेशन कडून स्वप्नातील गाव म्हणून २१ जानेवारी २०२५ रोजी खडकोली गावाला प्रमाणित करण्यात आले. स्वप्नातील गाव पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात ढोल ताशा आणि लेझीम नृत्याच्या तालात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी गाव विकास समितीने स्वदेस फाऊंडेशन तसेच शासकीय अधिकारी यांना आमंत्रित केले होते.
गाव विकास समितीने उपस्थित असलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करून आपल्या गावाची झालेली प्रगती व त्यासाठी लाभलेले स्वदेस, शासन आणि ग्रामस्थ यांचे सहकार्य याचा प्रवास गाव विकास समिती सदस्य तसेच गाव विकास समिती सदस्य प्रताप सावंत यांनी सांगितला. आपल्या आराखड्यातील ८३% कामे पूर्ण केलेली असून पुढील प्रगती अशीच सुरू ठेवणार असे सांगितले. या सगळ्या कार्यात गाव विकास समिती, ग्रामस्थ मंडळ, महीला मंडळ क्रिडा मंडळ, मुंबई व सुरत मंडळ यांचे मोठे योगदान असल्याचे दिसून आले. तसेच आपल्या पाण्याची भविष्यातील चिंता दूर व्हावी यासाठी गावाने स्वदेस ने मार्गदर्शन केल्या प्रमाणे स्वजल स्पर्धे अंतर्गत असलेली ८०% कामे पूर्ण केली आहेत. त्यामध्ये स्रोत स्वच्छता, रंगरंगोटी, पाणी तपासणी, परसबाग लागवड शोष खड्डे इत्यादी
यावेळी शिवसेना दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, स्वदेस फाउंडेशनचे संचालक प्रदीप साठे, उपसंचालक तुषार इनामदार आणि वरिष्ठ व्यवस्थापक शाहिस्ता वरानी ,व्यवस्थापक भीमराव भालेराव व विनोद पाटील यांनी गावाने केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. तसेच उत्पन्न वाढीसाठी मार्गदर्शन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. मान्यवरांच्या हस्ते स्वप्नातील गाव प्रमाणपत्र देऊन गावाला सन्मानित करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी स्वदेस फाऊडेशन मार्फत गायत्री खुटवळ, ग्रामसेविका मनीषा गजमल,अंगणवाडी परिवेशिका शकुंतला रब्बेवार, केंद्रप्रमुख कुमार खामकर व साळवी ,प्रताप सावंत तसेच रा जि प शाळेच्या मुखयाध्यापीका कुंजलता पाटील शिक्षक वर्ग परेश अंधेरे,विठाबाई लाखाडे, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला पवार,सुजाता लोखंडे,संदेश पवार, हारिचंद्र सुतार, आशा सेविका ऋशाली पवार,दिपक चव्हाण, स्वदेस फाऊडेशन मार्फत वरिष्ठ व्वस्थापक सिद्धेश शिर्के,राहुल टेंबे,ऋतुजा खडस,दीप्ती खैरे डॉ केतन चव्हाण तसेच महिला वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. गावची एकजूट असेल तर अशक्य असे काहीच नाही हे गावाने सिद्ध करुन दाखवले. सूत्र संचालन कमलेश पवार यांनी केले मुंबई मंडळाचे सदस्य अजित कारंजे,दत्ताराम सकपाळ,मुरहरी चव्हाण यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.