Join WhatsApp Group
आपला जिल्हा

दैनिक युवक आधारच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

प्रतिनिधी - सचिन पवार ( माणगांव )

माणगांव – दैनिक युवक आधारच्या पहिल्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा कार्यक्रमाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज पूजन व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खांदेश्वर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे मॅडम पनवेल वाहतूक पोलीस वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील प्ररणिता फाउंडेशनच्या संस्थापिका साक्षी सागवेकर दिशा महिला मंचच्या संस्थापिका नीलम दाते आंधळे महिला बचत गटाच्या प्रमुख स्वप्ना साखरे डॉ. शुभदा निल सामाजिक कार्यकर्ते बबन बारगजे तसेच दैनिक युवक आधारच्या मुख्य संपादिका भारती संतोष आमले याच्या हस्ते करण्यात आला.

मागील एक वर्षापासून वृत्तपत्राच्या स्पर्धेत दैनिक युवक आधारची घोडदोड सुरू केली होती दैनिक युवक आधार अति कमी वेळामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय वृत्तपत्र म्हणून नावारूपास आले व फक्त पनवेल मध्ये नसूनच संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये दैनिक युवक आधार हे वृत्तपत्र पोहोचले आहे.

या कार्यक्रमादरम्यान जेष्ठ पत्रकार दैनिक युवक चे महाराष्ट्र प्रतिनिधी प्रमुख  प्रदीप पाटील, लोकमत चे पत्रकार मयूर तांबडे, पनवेल वैभवचे संपादक अनिल कुरगुडे, रायगड सम्राट संपादक शंकर वायदंडे, पत्रकार सोनल नलावडे, लाईव्ह मराठी ब्रेकिंग न्यूजचे संपादक सचिन पवार, युथ महाराष्ट्र संपादिका दिपाली पावसकर, पत्रकार आनंद पवार, भारतीय माजी सैनिक समीर दूंद्रेकर, उसर्ली ग्रामपंचायतीचे लेखनिक किरण भगत, श्री दत्तकृपा बिल्डर्स सुरज भगत, दैनिक युवक आधार चे रायगड प्रतिनिधी प्रमुख मनोहर भोईर, पत्रकार राणिता ठाकूर, पत्रकार सायली साळूंके, पत्रकार आरती सुरवसे, पत्रकार उमाकांत पानसरे, दैनिक युवक आधार चे कार्यकारी संपादक सुरेश भोईर, उपसंपादक विलास गायकवाड, खूप सहसंपादक मुकुंद कांबळे, निवासी संपादक राकेश पाटील, कोकणी विभाग प्रतिनिधी प्रमुख विजय दूंदरेकर, पनवेल तालुका प्रतिनिधी निजाम सय्यद, संपादक संतोष आमले आधी उपस्थित होते

दैनिक युवक आधार संपादक संतोष आमले यांनी आपल्या प्रास्ताविकात पत्रकारितेची मूलभूत तत्त्वे, तिची प्रभावीता आणि समाजातील महत्त्वाची भूमिका यावर प्रकाश टाकला. त्याचप्रमाणे आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून युवा वर्ग तसेच सामाजिक सर्व स्तरावरील बातम्यांना न्याय देण्यास कटिबद्ध राहतील अशी यावेळी त्यांनी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैनिक युवक आधारचे संपादक संतोष आमले यांनी केले  तर सूत्रसंचालन पूर्णा पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन सुरेश भोईर कार्यकारी संपादक यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दैनिक युवक आधारच्या प्रतिनिधीने विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

संस्थापक - स्व. प्रवीण रमेश गोरेगांवकर संपादक - श्री. प्रसाद रमेश गोरेगावकर

आपल्या जिल्ह्यातील ताज्या घडामोडी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शेैक्षणिक, क्रिडा विभागातील बातम्या झटपट सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यासाठी रायगड प्रतिबिंब हे माध्यम आपल्या पर्यंत घेऊन पोहचत आहोत.... जिथे अन्यायाविरुद्ध लढण्यास कोणी नाही, तिथे रायगड प्रतिबिंबच्या रुपात आम्ही . सुरुवात नव्या पर्वाची..... अन्यायाविरुद्ध लढण्याची...

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या वेबसाईटवरील बातम्या,लेख,फोटो तसेच ईतर साहित्य मुख्य संपादक यांच्या परवानगी शिवाय कॉपी करू नये