बेलापूर येथील बांधकाम क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या स्मार्ट सिटी डेव्हलपर्स ऑफिस चे शानदार उदघाटन.
प्रतिनिधी - विठ्ठल ममताबादे ( उरण )

उरण – तालुक्यातील मोठी जुई येथील प्रविण घासे हे उत्तम सामाजिक कार्यकर्ते असून उत्तम बांधकाम व्यावसायिक देखील आहेत. दिवसेंदिवस त्यांची प्रगती उत्तरोत्तर वाढतच आहे.बांधकाम क्षेत्रात खुप कमी वयात खुप उंच भरारी घेणारे प्रवीण घासे यांनी मोठी जुई येथील ग्रामीण भागातून व्यवसायाला सुरवात करून नवी मुंबईत बांधकाम क्षेत्रात नावारूपाला आले. त्यांनी नवी मुंबईत सर्वांच्या सेवेसाठी बेलापूर येथे स्मार्ट सिटी डेव्हलपर्स या नवीन ऑफिस सुरु केले असून नुकताच त्याचे उदघाटन करण्यात आले.
या उदघाटन प्रसंगी उद्योजक यशवंत दादा घासे, शेखर तांडेल, शिवसेना पनवेल उपाध्यक्ष विठ्ठल मुंगजी, उरण भाजप उपाध्यक्ष मुकुंद गावंड, भाजप युवा अध्यक्ष निलेश पाटील, रायगड जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, भाजप पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, विशाल पाटेकर, रायगड भूषण हरेश्वर ठाकूर, उद्योगपती कुलदीप नाईक, देवेंद्र पाटील, समीर फडके, कलाकार सनी फडके, गिरीश म्हात्रे, नितेश भोईर, कुमार पाटील, सरपंच दिपक भोईर, धनेश गावंड, मोठी जुई भाजप गाव अध्यक्ष भरत पाटील, उरण विधान सभा विस्तारक करण ठाकूर, नंदन म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बांधकाम व्यवसायात चांगली कामगिरी करत असल्याबद्दल व नवीन ऑफिसचे उदघाटन केल्या बद्दल विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांनी प्रवीण घासे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.