पेण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी जिवन पाटील यांना कामगार व सवर्ग कर्मचारी संघर्ष समितीचे निवेदन
प्रश्न निकाली निघाले नाही तर ६ ऑगस्ट रोजी करणार कामबंद आंदोलन

प्रतिनिधी – किरण बांधणकर (पेण) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ता.२० मार्च २३ रोजी विधान भवन, मुंबई येथे घेतलेल्या बैठकीमध्ये राज्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायती मधील प्रदिर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव, वित्त सचिव, नगरविकास सचिव, सामाजिक न्याय विभाग सचिव आणि आयुक्त तथा संचालक, नगरपालिका प्रशासन संचालनालय यांच्या उपस्थितीत घेतले होते. त्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी गेली २ वर्षे झालेली नसल्यामुळे राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत कर्मचारी यांनी विविध प्रकारे आंदोलन जसे ता १८ जून २०२४ रोजी राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन त्याचप्रमाणे प्रश्न न सुटल्यास ता.१ जुलै २०२४ रोजी राज्यातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आणि अंतिमतः प्रश्न निकाली निघाले नाही तर दि. ०६ ऑगस्ट २०२४ रोजी राज्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतीमधील कामगार कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत पेण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक जिवन पाटील यांना महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती पेण यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी अधिकारी शिवाजी चव्हाण,रमेश देशमुख, महेश वडके,उमंग कदम,नरेंद्र पाटील,दिलीप बांधणकर समवेत अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.