म्हसळा तालुका जनता दरबारात मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकारी वर्गाला मंजुर विकास बांधकामांची गती वाढवण्याच्या दिल्या सुचना.
२६ जानेवारी पर्यंत कामे पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांना जाब विचारणार.

प्रतिनिधी – संतोष उध्दरकर ( म्हसळा ) म्हसळा तालुका स्तरावर लोकपयोगी विकास कामासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातुन झूकते माप देण्यात आले आहे या मध्ये प्रामुख्याने श्रीवर्धन मतदार संघात खासदार सुनिल तटकरे,महीला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी नागरीवस्ती आणि पर्यटन विकासाला प्राधान्य देत करोडो रुपयांची विकास कामे शासनस्तरावर मंजुर केली आहेत.मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करूनही शासकीय अधिकारी आणि सबंधित ठेकेदार यांच्या कडून विकास कामांचे बांधकाम वेळेत पूर्ण होऊ शकली नाहीत याच अनुशंगाणे म्हसळा तालुका जनता दरबारात मंत्री आदिती तटकरे यांनी नागरिकांनी उपस्थित केलेल्या तक्रारीची दखल घेताना अधिकारी आणि ठेकेदार यांच्या कामाचे पद्धतीत आणि क्षमतेत तफावत दिसुन आल्याने अधिकारी वर्गाने विकास बांधकामात गती वाढवावी अशी सूचना केली.जे ठेकेदार नोटीस बजावूनही काम करीत नाहीत अशा ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले.विकास कामे वेळेत पूर्ण केली नाहीत तर संबधीत खात्याचे अधिकारी वर्गाला जबाबदार धरले जाईल अशी ताकीद देण्यात आली.यावेळी मंत्री आदिती तटकरे यांनी जनता दरबारात उपस्थित ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि लागलीच दखल घेऊन जागीच निपटारा केला तर जनतेच्या काही कामांचे निवेदन स्वीकारून त्याचे पूर्ततेसाठी शेरा मारुन संबंधीत वरिष्ठ अधिकारी कर्मचारी यांचे निदर्शनात आणून दिले आहे.
म्हसळा पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित जनता दरबारात प्रांताधिकारी महेश पाटील,उप विभागीय पोलिस अधिकारी सविता गर्जे, गट विकास अधिकारी माधव जाधव,गट शिक्षण अधिकारी रमेश चव्हाण,मुख्याधिकारी विठ्ठल राठोड,स.पो.निरिक्षक संदीप कहाळे, सा. बांधकाम अभियंता लुंगी, उप अभियंता शेट्ये, पाणी पुरवठा अभियंता फुलपगारे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, जिल्हा चिटणीस महादेव पाटील, नगराध्यक्ष संजय कर्णिक, उपनगराध्यक्ष संजय दिवेकर, माजी सभापती नाझिम हसवारे, महीला अध्यक्षा मिना टिंगरे, माजी सभापती बबन मनवे, छाया म्हात्रे, शगुप्ता जहांगीर, संदीप चाचले, सुनिल शेडगे, भाजप तालुका अध्यक्ष तुकाराम पाटील, गण अध्यक्ष सतीश शिगवण, भाई बोरकर, समीर काळोखे, संतोष सावंत, महेश घोले, किरण पालांडे, प्रकाश लोणशिकर, रमेश काणसे, वृषाली घोसालकर,अनिल टिंगरे आदी मान्यवर पदाधिकारी, विविध खात्यांचे अधिकारी, पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जनता दरबारात मंत्री आदिती तटकरे यांनी अधिकारी वर्गाला विशेष सुचना करताना रखडलेल्या कामासाठी विशेष गती प्राप्त करून गांभीर्याने घ्या २६ जानेवारी पर्यंत कामे पूर्ण न झाल्यास अधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कामात पारदर्शकता असावी हलगर्जी केल्यास अधिकारी किंवा ठेकेदार यांची गय केली जाणार नाही.तक्रारी आल्या तर योग्य वेळी योग्य करवाई केली जाईल अशा सूचना देण्यात आल्या.याच वेळी त्यांनी लवकरच पुर्ण झालेल्या विकास कामांचे लोकार्पण सोहळा पार पाडले जातील असे सांगितले.