म्हसळा हिंदु संघटनेच्या वतीने हिंदू धर्म जागरण मेळावा ; हजारोंच्या संख्येने लोटला हिंदू जन सागर
प्रतिनिधी - संतोष उद्धरकर ( म्हसळा )

म्हसळा – दि. ११ जाने. रोजी म्हसळा नगरीत म्हसळा तालुका हिंदू संघटनेच्या वतीने हिंदु धर्म जागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात म्हसळा तालुक्यातुन तसेच जिल्हातुन हजारोंच्या संख्येने हिंदु जन सागर लोटला होता. संपूर्ण जिल्हाचे लक्ष या मेळावा कडे लागुन राहिले होते. म्हसळा नगरी अगदी भगवामय दिसत होती, श्री धाविर देव महाराज प्रागणातुन सकाळी भव्य अशी हिंदू धर्म दिंडी जय श्री राम जयघोषात व पांडुरंगाच्या गजरात काढण्यात आली. या दिंडी सोबत ह. भ. प. श्री. शिरीष महाराज यांची रथामध्ये बसवून मिरवणुक देखील काढण्यात आली. या सोहळ्यात तरुण, ग्रामस्थ, महिला, लहान मुल, अबाल वृद्ध सहभागी होऊन हरिनामाचा गजर करीत दिंडी पुढे सरकत होती. या मेळाव्याचे आयोजन न्यु इंग्लिश स्कुल पटांगणात करण्यात आले होते.
सर्व प्रथम हिंदु संघटनेच्या वतीने ह.भ.प. श्री. शिरिष महाराज यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, संघटना अध्यक्ष समीर बनकर यांनी सांगितले कि, हिंदु जन जागृती होणे गरजेचे आहे तसेच या मेळाव्यात प्रमुख उपस्थिती असणारे ह.भ.प. श्री. शिरीष महाराज यांनी सर्व प्रथम आपण हिंदु म्हणून एकत्र आलात त्या बद्दल आपले सर्वांचे आभार, तुम्ही कोणात्याही जाती धर्माचे असा पण त्याही पेक्षा हिंदू धर्माचा अभिमान बाळगा, आपणा धर्म श्रेष्ठ माना. प्रत्येक राज्यकर्त्याला हिंदुत्वाचा अभिमान वाटला पाहिजे,माझ्या महाराष्ट्रातील बांधवांना सांगणे आहे कि म्हसळा नगरीत येऊन पहा कसा हिंदू एकत्र आहे तो. हिंदुच्या भूमित इतर भाषिक फलक लागल्यावरून महाराज यांनी खंत व्यक्त करीत प्रशासनाला पत्र द्या कि इथे फक्त मराठीतच फलक लागले पाहिजेत असे ठणकावून सांगितले. मराठीचा अभिमान बाळगा, हिंदु म्हणुन एकत्र यायला पाहिजे. आपला जन्म या भारत मातेच्या भुमित झाला आहे याचा अभिमान बाळगा असे देखील महाराज यांनी सांगितले. तसेच हिंदुना धर्मांतरण करण्याचे षडयंत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहे, माझ्या माय बहिणींनो सावध रहा, कोणत्याही भुल थापांना बळी पडु नका. वक्फ बोर्ड, लव जिहाद, लॅण्ड जिहाद या सारखे प्रकार घडत आहेत. या पासुन सावध रहा. आपली मुलगी – मुलगा कुठे जातो ? काय करतो ? कुणा सोबत फिरतो ? या कडे लक्ष द्या. या विषयाला हात घालुन समस्थ जन समुदायाला सावधगिरीचा इशारा देण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन सचिन करडे, सुशिल यादव यांनी केले तर आभार महेश पवार यांनी मांडले.
या कार्यक्रमाची समाप्ती पसायदान म्हणुन करण्यात आली. श्रीवर्धन पोलीस उप अधिक्षक सविता गर्जे मॅडम यांच्या मागदर्शनात व सहायक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे निगराणी खाली पोलीस प्रशासन यांनी ऊतम सहकार्य केले. तसेच भोजनाची व्यवस्था वाटप करण्यासाठी सस्तंग यांची अनुयायी उपस्थित होते. कार्यक्रम सुरळीत व शिस्तबद्ध होण्यासाठी स्वयंसेवक नेमण्यात आले होते. श्रीवर्धन बजरंग दल, म्हसळा बजरंग दल, गोरक्षक, म्हसळा बौद्ध महासभा, पत्रकार संघ यांच्या कडुन महाराज यांना पुष्प गुच्छा देऊन दर्शन घेतले. यावेळी म्हसळा हिंदु संघटना अध्यक्ष समीर बनकर यांच्या सह तालुक्यातील प्रत्येक समाज अध्यक्ष यांच्या सह हजारोच्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते.