निवाची नळेफोडी हे गाव स्वप्नातील गाव म्हणून घोषित.
प्रतिनिधी - नंदकुमार चांदोरकर ( चांदोरे )

चांदोरे – माणगाव तालुक्यातील चांदोरे ग्रामपंचायत हद्दीतील निवाची नळेफोडी हे गाव स्वप्नातील गाव म्हणून घोषित करण्यात आले आहे. स्वप्नातील गाव सोहळ्यात मोठ्या उत्साहात आणि ग्रामस्थ, महिला, तरुण वर्ग व गावविकास समिती निवाची नळेफोडी तसेच स्वदेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या जल्लोषात व पारंपारीक वाद्याच्या सोबत बनाटी खेळत कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन मा. श्री. रमेशजी मोरे – सभापती कृषिबाजार समिती माणगांव तसेच प्रदीप साठे संचालक स्वदेस फाउंडेशन तसेच इतर मान्यवर याच्या शुभहस्ते करुन उदघाटन करण्यात आले.
स्वप्नातील गाव घोषित करताना गाव विकास समितीच्या सदस्य व गावचे अध्यक्ष गोपाळ बडबे यांनी स्वप्नातील गाव होण्यासाठी येणाऱ्या अडथळे व त्यावर केलेली मात याविषयी सर्वांना माहिती दिली. महेश भुवड व सौ. माही भुवड यांनी गावात मागील तीन वर्षापासून झालेल्या गावाच्या प्रगतीची माहिती दिली. गाव विकास समितीने शासकीय योजनेतून अंतर्गत रस्ते, पथदिवे, शोषखड्डे तयार करण्यात आले. मागील तीन वर्षांमध्ये शासनाकडून विकास कामे करून घेतली असल्याची माहिती देण्यात आली.
निवाची नळेफोडी गाव विकास समितीने क्राउड फंडिंग जमा करुन गावातील उर्वरित कामांसाठी निधी उभारण्यात आला. या निधीमधून गावातील घरांना कलर देण्यात आले. उघड्यावर जाणारे खराब पाण्याचे व्यवस्थापण काम पूर्ण करण्यात आले. त्याच पध्दतीने पिण्याच्या पाण्यासाठी स्वदेस फाउंडेशन यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची योजना राबविण्यात आली. हि सर्व कामे गाव विकास समिती व ग्रामस्थांनी केल्यामुळे स्वदेस फाऊंडेशन चे डायरेक्टर प्रदीप साठे यांनी समितीचे व ग्रामस्थांचे कौतुक केले तसेच रमेश मोरे साहेब यांनी गावाला १०० टक्के मापदंड पूर्ण करण्यासाठी लागणारी मदत करण्यात येईल असे सांगितले तर सुजित शिंदे यांनी चांदोरे संपूर्ण ग्रामपंचायत हद्दीतील गावे स्वप्नांतील करण्यासाठी लागणारी मदत करण्याचे आश्वासन दिले तर राकेश तुपट यांनी गावाला पुढील शासकीय कामांसाठी लागणारी मदत करु असे सांगितले. सोबतच हे गाव १००% स्वप्नातील गाव म्हणून घोषित व्हावे यासाठी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. गावविकास समितीने यापुढे देखील आदर्श गाव व गावामध्ये वेगवेगळे शासकीय काम व तसेच गावाचा सर्वांगीण शाश्वत विकास करण्यासाठी आम्ही गाव विकास समिती व ग्रामस्थ प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली.
यावेळी स्वदेस फाउंडेशनचे मा. प्रदीप साठे, मेघना फडके, विशाल वरुटे, शीतल सूर्यवंशी, भीमराव भालेराव, सुबोध काणेकर , सिद्धेश शिर्के, कुंदन जाधव, कोमल माने त्याच प्रमाणे मा. सभापती सुजित शिंदे , चांदोरे ग्रामपंचायत सरपंच साक्षी शिंदे, माणगांव संपर्क प्रमुख श्री. राकेश तुपट, चांदोरे ग्रामपंचायत उपसरपंच- नथुराम चाचले व ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर गाव विकास समितीचे सदस्य ग्रामस्थ तसेच गावाचे अध्यक्ष गोपाळ बडबे, उपाध्यक्ष राजाराम झुझम, सचिव – रामचंद्र भुवड, उपसचिव दिनेश बडबे, खजिनदार दिपक भुवड, महिला अध्यक्षा सौ.सुनंदा भुवड सर्व ग्रामस्थ महिला तरुण वर्ग शाळेचे शिक्षक श्री. सिकंदर लांडे आदी मान्यवर उपस्थित होते.