श्रीवर्धनमध्ये आयुष्यमान भारत योजने अंतर्गत जेष्ठ नागरिक आरोग्य शिबिर संपन्न
प्रतिनिधी - संदीप लाड ( श्रीवर्धन)

श्रीवर्धन – दि. २४ ऑगस्ट रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आयुष्यमान आरोग्य मंदिर उपकेंद्र बागमांडला व आरोग्य पथक बागमांडला प्राथमिक आरोग्य केंद्र वाळवटी तालुका श्रीवर्धन अंतर्गत वयोवृध्दांकरित आरोग्य शिबीर घेण्यात आले होते या शिबिरामध्ये बीपी, शुगर, हिमोग्लोबिन आधी आजारांवर उपचार देण्यात आले असुन शिबिरात सहभागी झालेल्या दोनशेहून अधिक स्त्री-पुरुषांना डॉ कुलदीप चौधरी यांनी योगा व्यायाम सोबतच लाईफस्टाईल आहाराबाबत मार्गदर्शन केले.
या आरोग्य शिबिरात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नारायणकर, डॉ. कुलदीप चौधरी, आयुष रिसर्च अनुसंधान अधिकारी CCRAS, आयुष मंत्रालय भारत सरकार डॉ. प्रमिला अहिरे, SRF डॉ. शुभम पोटदर SRF समुदाय आरोग्य अधिकारी गणेश गायकवाड, आरोग्य सेविका पाटील सिस्टर फार्मासिस्ट वैभव पाटील, दिशा आरेकर, दिपाली परकर, रीधी गाडे समिता खेडकर , पवार मावशी आदी उपस्थित होते.