जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूट इंग्लिश मीडियम स्कूल उरण प्री प्रायमरी आणि प्रायमरी यांच्यातर्फे शाळेमध्ये वार्षिक समारंभ उत्साहात साजरा
प्रतिनिधी - विठ्ठल ममताबादे ( उरण )

उरण – कै. गो. ना. अक्षीकर विद्या संकुलातील जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूट इंग्लिश मीडियम स्कूल उरण प्री प्रायमरी आणि प्रायमरी यांच्यातर्फे शाळेमध्ये वार्षिक समारंभ दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी जितेंद्र मिसाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण, राखी धिंग्रा मँडम फाउंडर अँड चेअरमन पीस अँड एज्युकेशन ट्रस्ट हे मान्यवर उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश म्हात्रे बोर्ड ऑफ डायरेक्टर जी. ई. आय. दादर यांनी भूषविले. माजी शालेय समिती अध्यक्ष सदानंद गायकवाड, शालेय समिती सदस्य, संकुलातील मुख्याध्यापक, माजी सदस्य, मुख्याध्यापक -शिक्षक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. एकंदरीत मोठया उत्साहात, उत्तम प्रतिसादात सदर कार्यक्रम संपन्न झाला.