तळा तालुक्यातील फॉरेस्ट हिल्स रिसॉर्ट प्रशासनाच्या विरोधात शिवसेना पुन्हा आक्रमक
70 हून अधिक कामगारांना शिवसेनेमुळे मिळाले न्याय : शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर

प्रतिनिधी – रिजवान मुकादम ( पुरार ) रायगड जिल्हातील तळा तालुक्यामध्ये फॉरेस्ट हिल्स रिसॉर्ट यांच्या प्रशासनाकडून जवळपास 70 हुन अधिक स्थानिक कामगारांना अचानकपणे अनिश्चित कालावधीसाठी काढून टाकण्याचा निर्णय जुलै महिन्यामध्ये घेतला गेला होता त्या विरोधात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली फॉरेस्ट हिल्स तळा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करून लेबर कमिशनर कायद्यांतर्गत कामगारांना लागू असलेले सर्व नियम अटी व मिळणारे फायदे मिलावेत अशी मागणी करण्यात आली होती.
फॉरेस्ट हिल्स तळा प्रशासनाने कामगारांना कामावरुन काढल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी सज्जड दम देत इशारा दिला होता की कामगाराच्या हक्क व न्यायासाठी कायदा हातात घेऊ मात्र आम्ही कामगारांच्या पोट पाण्याचा प्रश्न सोडवू . त्यानंतर तीन महिने कोर्टात चाललेल्या दाव्याचा निकाल कामगारांच्या बाजूने लागला असून कमी केलेल्या कामगारांपैकी पहिल्या सहा कामगारांना त्वरित कामावर रुजू करण्यात यावे असे कोर्टाकडून आदेश मिळाल्याने शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या नेतृत्वात शिवसेना शिष्ट मंडळ हॉटेल प्रशासनाला माहिती देण्यास व कामगारांना कामावर घेण्यास सांगण्यासाठी गेले असता हॉटेल प्रशासनाने कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करत कामगारांना कामावर घेण्यास नकार दिले असल्यामुळे पुन्हा एकदा हॉटेल प्रशासन व कामगारांचा वाद विकोपाला जाण्याचे चिन्ह दिसत आहेत. मात्र शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी खंबीर विश्वास व्यक्त केले कि 6 कामगारांना रुजू करण्याचे कोर्टाचे आदेश आहे तसेच इतर कामगारांच्या रुजू होण्याचे आदेश देखील कोर्टाकडून लवकरच येणार आहे.
फॉरेस्ट हिल्स रिसॉर्ट च्या एच आर कडे फोनवर वार्ता झाली असता एच आर कडून आजारी असल्याचे सांगत कामगारांना कामावर घेण्यास नकार दिल्याने तसेच कुठल्या प्रकारचा कामगारांना कामावर घेण्या संदर्भात लेखी स्वरूपात हॉटेल प्रशासनाकडून हमी न दिल्यामुळे, फॉरेस्ट हिल्स रिसॉर्ट विरोधात कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याची पोलीस ठाण्यात तक्रार करून पोलिसांना तात्काळ कारवाई करण्यासाठी विनंती करण्यात येईल असे शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्याकडून व्यक्त करण्यात आले.
यावेळी अखिल भारतीय कामगार श्रमिक संघटनेचे संघटनेचे अध्यक्ष पवार, तळा तालुकाप्रमुख प्रद्युम्न ठसाळ, तळा शिवसेना शहरप्रमुख राकेश वडके, यांच्यासह तळा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, रिसोर्ट मध्ये काम करणारे शंभरहून अधिक कामगार उपस्थित होते.