प्रजासत्ताक दिनानिमित्ताने भव्य निबंध स्पर्धेंचे निकाल व पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांचे उपस्थित संपन्न!
प्रतिनिधी - पद्ममाकर उभारे ( माणगांव )

माणगांव – माणगांव येथे छत्रपती शासन व अर्जुन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी 2025 अमृत महोत्सव प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य निंबध आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे निकाल व पारितोषिक वितरण सोहळा 14 फेब्रुवारी 2025 रोजी अशोकदादा साबळे विद्यालयात मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडला. छत्रपती शासन व अर्जुन फाउंडेशनचे अध्यक्ष अमेय प्रभाकर उभारे यांचे याकरिता विशेष सहकार्य लाभले.
या सोहळ्यानिमित्त प्रमुख मार्गदर्शन व प्रमुख पाहुणे माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीवजी साबळे साहेब,माणगाव नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक, व माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे,शिपूरकर स्कूलचे चेअरमन अरुण पवार, शिपुरकर स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.मनीषा मोरे,तसेच महेकर मॅडम, नितीन बामूगडे, पत्रकार सलीम शेख या सर्व प्रमुख पाहुण्यांनी उपस्थिती दर्शवली व त्यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली
यावेळी पाचवी ते सातवी इंग्लिश माध्याम गटातून प्रथम क्रमांक दुर्वा विजय मुंढे,द्वितीय अदिती अमोल घाग, तृतीय वेद संतोष खडतर,आठवी ते दहावी गटातून प्रथम मैत्री विनोद साळवी, द्वितीय अंतरा भावेश मुंढे, तृतीय निरव अविनाश पवार,अकरावी ते बारावी गटातून प्रथम अरिबा अब्दुल बासित सांगे, द्वितीय अझरा दाऊद मापकर तसेच पाचवी ते सातवी मराठी माध्यम गटातून प्रथम प्रज्ञा राजेंद्र ढाकवल, द्वितीय आनंद मुकुंद दहिफळे, तृतीय आर्य अंकुश शेलार,आठवी ते दहावी गटातून प्रथम प्रियंका नारायण पवार, द्वितीय अक्षरा शांताराम गुगले, तृतीय सुयश सुभाष गुगले,अकरावी ते बारावी गटातून प्रथम रिया दीपक गावडे, द्वितीय इन्फ्रा निजर खान, तृतीय अपूर्वा संतोष पवार तसेच खुल्या गटातून प्रथम अमृता मिलिंद फाटक,द्वितीय संतोष सुदाम म्हात्रे यांनी यश संपादन केले. दरम्यान सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार व सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाकरिता छत्रपती शासन प्रतिष्ठान व अर्जुन फाउंडेशन माणगाव रायगड हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.