समस्त पोलादपूरवासीयांचा वतीने मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारे राज पार्टे यांचा भव्य सत्कार सोहळा
प्रतिनिधी - देवेंद्र दरेकर (पोलादपुर)

पोलादपूर– पोलादपूर तालुकावासीयांचा वतीने आपली माती आपली माणसं सामाजिक संघटनेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष राज पार्टे यांचा मुंबई घाटकोपर येथे रविवारी एक सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यकम के.व्ही.के घाटकोपर सार्वजनिक शाळा, साईनाथ नगर रोड, एल.बी.एस.रोड घाटकोपर येथे पार पडणार आहे.
राज पार्टे हे नेहमीच सामान्य माणसासाठी लढत असतात. पोलादपूर तालुक्यातील महावितरण, तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, एसटी डेपो येथे नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत त्यांनी नेहमीच आवाज उठवला आहे. तसेच मुंबई येथे देखील मराठी माणसासाठी ते नेहमी लढत असतात त्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत पोलादपूर वासियांच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून वारकरी संप्रदायातील गायनाचार्य मृदुंगाचार्य व सारेगम लिटिल चॅम्प्स फेम कुमारी ज्ञानेश्वरी घाडगे यांचे सुस्वर भजन यावेळी ऐकायला मिळणार आहे. सदर कार्यक्रमाला पोलादपूर तालुक्यातील अनेक मान्यवर व गाव कमिटी उपस्थित राहणार आहेत