रा. जि. प. शाळा हरकोल कोंड येथे ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत ४ आदिवासी विद्यार्थ्यांना सायकल वाटप.

गोरेगांव – भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो, ब्रिटीश वसाहतवादी राजवटीचा अंत आणि स्वतंत्र भारताची सुरुवात याच दिवशी झाली होती. या दिवशी नव युगाची पहाट झाली त्यामुळे संपूर्ण देशात हा दिवस हर्षोल्हासात साजरा केला जातो.
रा. जि. प. शाळा हरकोल कोंड येथे देखील स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुरुवातीस शाळेचे मुख्याध्यापक तसेच हरकोल केंद्राचे केंद्र प्रमुख श्री. पालकर गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर संपुर्ण गांवातुन बँड पथकासोबत देशभक्तीपर घोषणा, गाणी म्हणत प्रभातफेरी काढण्यात आली.
प्रभातफेरी नंतर शाळेच्या पटांगणात बाल सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्येची देवता सरस्वतीचे पुजन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक सादर करताना श्री. पालकर गुरुजी यांनी “हर घर तिरंगा” अभियानाविषयी माहिती दिली पुढे शाळेकरीता शैक्षणिक साहित्य तसेच विद्यार्थ्यांकरिता छत्री, दप्तरे, वह्या, पेन, पाट्या उपलब्ध करुन देणाऱ्या मु़ंबई मंडळातील तरुण सदस्य, मा. विश्राम बांद्रे (कुणबी समाज ट्रस्ट मुंबई ) येथील दानशुर व्यक्तींचे आभार व्यक्त केले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र दिनानिमित्त भाषणे सादर केली तर माजी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाबाबत मनोगत व्यक्त केले.
दरम्यान कु. रेवती सतिश तानवडे (M. S. Canada) व चौधरी साहेब यांनी सामाजिक बांधिलकी जपत शाळेत येणाऱ्या ६ वी ते ८ वी च्या ४ आदिवासी विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. दिप्ती काप, सरपंच रोशन पांचाळ, माजी सरपंच ज्ञानदेव पदरत, ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष श्री.यशवंत पदरत, उपाध्यक्ष महादेव शिगवण, पोलिस पाटील, आजीमाजी विद्यार्थी तसेच आदिवासी वाडीतील ग्रामस्थ व शिक्षकवृंद उपस्थित होते.