लाडक्या बहिणींना कार्यक्रमाला घेऊन येणाऱ्या बसला अपघात; अपघातात दोन महिला किरकोळ जखमी
जखमींना उपजिल्हा रुग्णालय माणगांव तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगांव येथे हलविले

गोरेगांव – मुख्यमंत्री लाडकी बहिण वचनपुर्ती कार्यक्रमाला जाणाऱ्या बसला माणगांव तालुक्यातील कुमशेत गांवानजीक एका अवघड वळणावर अपघात होऊन बस दिडशे फुट खोल दरीत कोसळली आहे. सुदैवाने कोणतीही जिवित हानी झालेली नाही.
आज दि. ९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री लाडकी बहिण वचनपुर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणविस तसेच दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून महिला येणार होत्या. तालुक्यातील रानवडे या गांवातील देखील महिला सकाळी या कार्यक्रमासाठी निघाल्या होत्या परंतु प्रवास करित असताना कुमशेत येथील अवघड वळणावर बस आली असता ड्रायव्हरचे संतुलन सुटुन बस थेट दिडशेफुट खाल जाऊन अपघात झाला.
अपघातात जखमी झालेल्या काही प्रवाशांना शिवसेनेच्या रुग्णवाहिकेने प्राथमिक उपचारासाठी माणगांव उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे हलविण्यात आले तर १० प्रवासी आणि ड्रायव्हर यांना प्राथमिक आरोग्य केंद्र गोरेगांव येथे हलविण्यात आले होते.
प्राथमिक आरोग्य केंद्र, गोरेगांव येथे अपघातग्रस्त ११ रुग्णांची नांवे पुढील प्रमाणे
०१ ) रजनी रमेश डोंगरे वय ५० रा. डोंगरोली
०२) सुजाता सिताराम चिंचाळकर वय ५० रा. रानवडे
०३ ) छाया सहादेव घाग वय ६० रा. रानवडे
०४) निलिमा जयंत गावडे वय ४५ रा. रानवडे
०५ ) नंदिनी नथुराम खामकर वय ५० रा. रानवडे
०६) अश्विनी गोविंद भागरे वय ४५ रा. रानवडे
०७) प्रविना महादेव गावडे वय ५५ रा. रानवडे
०८) रचना सहादेव जाधव वय २१ रा. विहूले
०९) सरिता दिपक पाटील वय ५० रा. रानवडे
१०) चंद्रकांत धोंडु चांदोरकर वय ४३ रा. चांदोरे
११) केशव हरिभाई वरपे वय ३८ रा. अहमदनगर