बलात्कारातील आरोपी मुसेब काझी पाली पोलिसांच्या ताब्यात; मागील चार वर्षांपासुन पिडीतेला धमकावुन करीत होता शोषण

प्रतिनिधी – रिजवान मुकादम ( गोरेगांव ) गोरेगांव येथील २६ वर्षीय आरोपी मुसेब मन्सूर काझी याच्या विरोधात पाली पोलिस ठाण्यात दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असुन आरोपीला पाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गोरेगांव येथील पिडीत महिला सद्या राहणार पनवेल हिने पाली पोलिस ठाण्यात दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी गोरेगांव येथील आरोपी आरोपी मुसेब मन्सूर काझी याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या पिडीत महिलेवर आरोपी गेल्या ४ वर्षांपासून धमाकावून सतत बलात्कार करत असल्याचे या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. पाली पोलिस ठाणे येथे पीडित महिलेने तक्रार नोंदवल्यानंतर तात्काळ पाली पोलिसांनी गोरेगांव येथील आरोपी मुसेब मन्सूर काझी याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४(१) ६४ (२) (m) ३५१ (२) नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पिडित माहिलेने दिलेल्या तक्रारीनुसार डिसेंबर २०२० मध्ये आरोपी मुसेब याच्या एर्टिगा गाडीमध्ये पनवेल ते गोरेगाव प्रवास करत असताना पीडित एकटी असल्याचा फायदा घेऊन रात्री १० च्या सुमारास पाली सुधागडच्या तीन ते चार किलोमीटर मागे आरोपी ने अंधारात गाडी थांबवून पीडितेवर जोर जबरदस्तीने बलात्कार केला व कोणाला सदर बाब सांगितल्यास जीवे मारून टाकण्याची धमकी दिली होती त्यामुळे सदर बाब पिडीत महिलेने कोणालाही सांगितली नाही, त्यानंतर पिडीत महिलेच्या पतीने घटनेच्या दुसऱ्या दिवशी तब्बेत बरी नसल्याने पुन्हा पनवेलला मुसेबच्या गाडीने येण्यास सांगितले त्याप्रमाणे आरोपीच्या गाडीत बसुन पनवेल गेली. या प्रकारानंतर आरोपीने अनेक वेळा पिडीतेला धमकावून बलात्कार करीत असे अशातच पिडीत महिलेच्या पतीचा जुलै २०२४ मध्ये अचानक हृदय विकाराने निधन झाले. पतीच्या निधनानंतर देखील आरोपी पीडितेच्या पनवेल येथील घरी जाऊन पीडितेला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करत होता अखेर पीडितेने धाडस करून आपल्या छोट्या बहिणीला पीडितेवर होत असलेल्या अत्त्याचाराची माहिती दिल्याने हा प्रकरण उघडकीस आले आहे . यानंतर पाली पोलीस ठाण्यात या नराधमा विरुद्ध तक्रार नोंदविण्यात आला असून आरोपी मुसेब काझी याला पाली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पाली पोलीस करत आहे.